पुणे : शहरातील मोकाट श्वान आणि मांजरांचे लसीकरण. नसबंदी करण्यासाठी महापालिकेने दोन संस्थांची नियुक्ती केली आहे. मात्र, या संस्थांच्या कामात नागरिकांकडून अडथळा निर्माण केला जात असल्याने मोहीम रखडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोहिमेला विरोध करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहराच्या हद्दीतील मोकाट श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया तसेच लसीकरण करण्याची मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. त्यासाठी ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>रेल्वे सुसाट! पुणे-दौंडदरम्यान ताशी १३० किलोमीटर वेगाने धावण्यास सुरूवात

महापालिकेच्या स्थायी समितीने १६ एप्रिल २०२० मध्ये युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटी आणि कॅनाइन कंट्रोल, केअर ट्रस्ट या दोन संस्थांची नियुक्ती केली आहे. शहरातील मोकाट श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण या दोन संस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, लसीकरण करण्यात आलेले मोकाट श्वान आणि मांजरे आपल्या भागात सोडण्यात येऊ नये, यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यात येत आहे. त्यामुळे या मोहिमेला अडथळा निर्माण झाला. अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डाॅ. भगवान पवार यांनी स्पष्ट केले.