पुणे: सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिका उपलब्ध करून दिल्या जात असतानाच बाणेर परिसरात महापालिका सदनिका उभारून त्या गरजूंना भाडेकरार तत्त्वाने देणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडून हडपसर, वडगाव खुर्द, खराडी येथे आरक्षित जागेवर एकूण ५ प्रकल्प उभारण्यात आले असून त्याद्वारे २ हजार ६५८ सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ऑनलाइन सोडत पद्धतीने आणि त्यानंतर प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने करण्यात आली आहे. त्यातील काही सदनिकांचे वितरणही महापालिकेकडून करण्यात आले आहे. त्यानंतर आता शहरातील गरजू नागरिकांना निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी भाडेकराराने घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

हेही वाचा >>>खुशखबर! पुणे विभागात पुढील दोन वर्षांत १६ हजार कोटींची गुंतवणूक अन् २९ हजार नोकऱ्या

शहरात नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विविध कामानिमित्त शहरात दरवर्षी किमान सहा ते सात लाख नागरिक पुण्यात येतात. सदनिकांच्या वाढत्या किमतीमुळे घर घेणे काही नागरिकांसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना अद्याप प्राथमिक स्तरावर असून बाणेर येथे उभारण्याचे नियोजित आहे. जागेची उपलब्धता, त्यातून निर्माण होणाऱ्या सदनिकांची संख्या याचा अभ्यास केल्यानंतरच योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation will construct flats in baner area and give them on tenancy basis pune print news apk 13 amy