पुणे : शहरातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी तसेच वडगाव खुर्द या पाच भागांत ४ हजार १७३ घरे बांधण्याचे नियोजन पुणे महापालिकेने केले आहे. यासाठी इच्छुक नागरिकांची नोंदणी महापालिकेने सुरू केली आहे.

शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पुणे महापालिकेने वडगाव बुद्रुक, खराडी तसेच हडपसर भागात यापूर्वी २ हजार ९१८ घरे बांधून त्याचे वितरण केले आहे. यासाठीचे अर्ज नागरिकांकडून मागवून त्याची शहानिशा, छानणी करून महापालिकेने घरांचे वाटप करत नागरिकांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. या ठिकाणी लॉटरी काढून नागरिकांना घराचे वाटप करण्यात आले. २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या घरांचे लोकार्पण करण्यात आले होते.

PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
18 slum rehabilitation schemes objected by the municipality will be cleared
पालिकेने आक्षेप घेतलेल्या १८ झोपु योजनांचा मार्ग मोकळा होणार?
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
A House from 8,000 Years Ago Found in Serbia
8,000-year-old dwelling found:८,००० वर्षांपूर्वीचे नवाश्मयुगीन शेतकऱ्याचं घर नेमका काय इतिहास सांगतं?
Jammu kashmir Article 370
Jammu kashmir Article 370 : जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर; भाजपा आमदारांचा सभागृहात गदारोळ
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

हेही वाचा >>>पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’

पहिल्या टप्प्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान आवास योजना ०.२’ ची घोषणा केली. त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढत या योजनेसाठी नागरिकांची घरांसाठी नोंदणी करण्याच्या सूचना महापालिकेला केली. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात धानाेरी, हडपसर, कोंढवा, बालेवाडी, वडगाव खुर्द, बालेवाडी येथे ही घरे उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी ४ हजार १७६ घरे बांधण्यासाठी पालिकेला ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे.

शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खराडी, हडपसर, बाणेर परिसरात घरे बांधली जाणार आहेत. महापालिकेच्या जागेवर घर बांधल्याने जमिनीचा खर्च नाही. त्यामुळे कमी दरात घरे देणे शक्य होते. पहिल्या योजनेनंतर दुसऱ्या योजनेलाही मोठा प्रतिसाद मिळेल. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Story img Loader