श्रीमंत महापालिकेच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. स्वच्छतागृह असूनही त्याचा उपयोग करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांच्या फरशा फुटल्या आहेत, तर दापोडी येथील शाळेतील पालिकेची ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे शाळा परिसरात मैला मिश्रीत पाणी पसरून दरुगधी पसरत आहे. त्यामुळे पालिका शाळांना प्राथमिक सुविधाही पुरवू न शकणारी पालिका खासगी शाळांबरोबर कशी स्पर्धा करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धायरकरवाडी येथील शाळेत स्वच्छतागृह नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उघडय़ावर जावे लागते. बोऱ्हाडेवाडी येथील शाळेला स्वच्छतागृह नाही. पिंपरी वाघेरे येथील शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शिवाय स्वच्छतागृह असूनही पाणी नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. दापोडी येथील शाळेमधून पालिकेची ड्रेनेज लाईन गेली आहे. अनेक वेळा हे ड्रेनेज बंद होऊन ते फुटते. त्यामुळे पाणी शाळेच्या परिसरामध्ये पसरते. मैलामिश्रीत पाणी असल्यामुळे परिसरामध्ये दरुगधी पसरते. त्यामुळे रोगराई होण्याचा धोका होऊ शकतो.

काळेवाडी, वाल्हेकरवाडी येथील शाळांमधील स्वच्छतागृहालाही पाणी नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. नेवाळे वस्ती येथील शाळेची इमारत भाडय़ाने घेण्यात आली आहे. मात्र तेथे स्वच्छतागृह नाही.

शहरातील अनेक पालिका शाळांच्या मुख्याध्यापकांनी इमारत दुरुस्तीची मागणी केली आहे. त्याबाबत महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र महापालिकेचा स्थापत्य विभाग निधी नसल्याचे कारण देत आहे. महापालिकेच्या सर्व शाळांच्या इमारतीना एकच रंग द्यावा अशीही मागणी केली आहे. – निवृत्ती शिंदे, सभापती, शिक्षण मंडळ, पिंपरी चिंचवड महापालिका

‘लोकसत्ता’च्या पाहणीत काय दिसले..?

  • ’ वाल्हेकरवाडी येथील शाळा रस्त्याच्या मध्यभागी
  • ’ या शाळेला संरक्षक भिंत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
  • ’ इंद्रायणीनगर येथील शाळा उद्यानामध्ये भरवावी लागते
  • ’ धायरकरवाडी येथील शाळेला संरक्षक भिंत नाही
  • ’ िपपरी वाघेरे येथील शाळेत पाण्याची सुविधा नाही
  • ’ नेहरुनगर शाळेतील खोल्यांची संख्या कमी
  • ’ जाधववाडी येथील शाळेची कौले फुटलेली
  • ’ रहाटणी पटसंख्या चांगली. मात्र वर्ग खोल्यांची संख्या कमी
  • ’ निगडी ओटा स्किम, भोसरी येथील इंग्रजी इमारतीच्या काचा फुटलेल्या
  • ’ कुदळवाडी येथील इमारत जुनी
  • ’ नेवाळे वस्ती येथील शाळेची इमारत भाडय़ाची. त्यामुळे जागा अपुरी पडते
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal schools in bad condition