पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. खेडजवळ अज्ञात कारने आठ महिलांना धडक दिली आहे. या धडकेत पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी ( १३ फेब्रुवारी ) रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस अज्ञात कारचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्न कार्यात काम करण्यासाठी १७ ते १८ महिला स्वारगेटहून पीएमपीएमल बसने खेडला गेल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ या सर्व महिला उतरल्या. पण, अंधारात मार्ग ओलंडताना यातील वयस्कर महिला चाचपडत होत्या. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने आलेल्या कारने आठ महिलांना धडक दिली.
हेही वाचा : पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
या भीषण अपघातात काही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमी तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कार चालक पुन्हा पुण्याच्या दिशेने पसार झाला आहे. खेड पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.