पुणे : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचा निर्धारित मार्ग बदलण्यावरून पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर येथील लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे याबाबत सत्ताधारी महायुतीतील काही राजकीय नेत्यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. खोडद येथील दुर्बीण प्रकल्पाला धक्का न लावता, पण सध्या आहे त्याच मार्गावर हा प्रकल्प साकारला जावा, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव नुकतेच पुणे दौऱ्यावर आले असताना, त्यांनी पुणे-नाशिक नवा रेल्वेमार्ग प्रस्तावित केल्याची माहिती दिली होती. सध्याच्या पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेमार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) हा सर्वांत मोठा दुर्बीण संशोधन प्रकल्प येतो. या मार्गासाठी तो हलविणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका घेऊन वैष्णव यांनी, ‘जीएमआरटी’ प्रकल्पाला धक्का न लावता पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक या नवीन रेल्वे मार्गाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा आदेश दिला असल्याचे सांगितले. मात्र, या नव्या मार्गाला स्थानिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा विरोध होताना दिसतो आहे.

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
Nashik will be connected to the proposed Vadhvan port
प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Child dies after falling into sinkhole in nashik
नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू
Elgar Sanghatanas march in Trimbak for houses
नाशिक : घरांसाठी त्र्यंबकमध्ये एल्गार संघटनेचा मोर्चा

हेही वाचा – Guillain Barre Syndrome: पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण; ‘या’ भागातले सर्वाधिक संशयित!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे, अपक्ष आमदार सत्यजित तांबे, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नवीन मार्गाला विरोध दर्शविला आहे, तर सत्ताधारी महायुतीतील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनीदेखील जुन्या मार्गावरूनच रेल्वे जावी, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचीही तयारी असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत महारेल आणि रेल्वे विभागात समन्वय नाही. ‘जीएमआरटी’ला धक्का न लावता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने बोगद्यातून रेल्वेचा मार्ग जाऊ शकतो, असा अहवाल ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. पण, रेल्वे प्रशासन ऐकण्यास तयार नाही. पुण्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुणे ते कोल्हापूर, पुणे ते नाशिक, पुणे ते अहिल्यानगर अशी शहरे जोडणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकल्पाबाबत सकारात्मक आहेत. नवीन मार्ग रद्द करून जुना मार्गच निश्चित करावा, यासाठी त्यांची पुन्हा भेट घेऊ. – सत्यजित तांबे, अपक्ष आमदार

मार्गाचे प्रथम सर्वेक्षण करताना ‘जीएमआरटी’ प्रकल्प नव्हता का? त्या वेळी सर्वेक्षण बरोबर असल्याचे सांगून खेड, हवेली तालुक्यात ३०० हेक्टरहून अधिक भूसंपादन करण्यात आले आहे. शेतमालाच्या बाजारपेठांसाठी हा मार्ग फायदेशीर आहे. हा मार्ग बदलू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. – दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

या प्रकल्पामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेती, औद्योगिक, व्यावसायिक धोरणांना मोठी चालना मिळणार आहे. जीएमआरटी प्रकल्पाबाबत तांत्रिक अडचणी असल्या, तरी त्यावर पर्यायी मार्ग असून, थेट मार्ग वळवणे धोक्याचे आहे. कारण, अनेक ठिकाणी भूसंपादन करण्यात आले आहे. ‘जीएमआरटी’च्या प्रशासनासोबत लवकरच संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढू. – डॉ. अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

हेही वाचा – वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत

जुन्या मार्गासाठी सिन्नर, संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले आहे. हा प्रकल्प उद्याोग, तसेच शेतकरी, नोकरदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याबाबत येत्या संसदीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात येईल. – राजाभाऊ वाजे, खासदार, शिवसेना (उद्धव ठाकरे)

आमच्या भागातून रेल्वे प्रकल्प गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पुणे-नाशिक या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती भागांना बाजारपेठांत मालाची ने-आण करण्यासाठी याचा फायदा होईल. शेतमाल वाहतूक आणि औद्योगिकदृष्ट्याही याचा फायदा होईल. आम्ही स्वखुशीने जमीन देण्यास तयार आहोत. – किसन सहाने, प्रकल्पबाधित शेतकरी

जुन्या मार्गाची वैशिष्ट्ये

● जुना मार्ग : पुणे-अहिल्यानगर-नाशिक

● रेल्वेचा वेग : प्रतितास २०० कि.मी.

● १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग

● विद्युतीकरणासह एकाच वेळी दुहेरी रेल्वे मार्गाचे काम

● खर्चाचा वाटा : ६० टक्के वित्तीय संस्थांकडून आणि राज्य सरकार व रेल्वे प्रत्येकी २० टक्के

● भूसंपादनासाठी १२०० ते १५०० कोटी रुपयांची गरज

Story img Loader