पुणे : देशाच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रसंगांना परिस्थितीनुरूप तोंड द्यावे लागते. मात्र, या बदलत्या परिस्थितीची संधी साधून कठीण निर्णय घेण्याची वेळ आल्यास देशसेवेच्या विचारांशी एकनिष्ठ राहून आव्हानात्मक मार्गांचा अवलंब करावा, असे मार्गदर्शन हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून उत्तीर्ण होणाऱ्या छात्रांना केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ व्यां तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा आज खेत्रपल मैदानावर दिमाखात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. एअर व्हाइस मार्शल सरताज बेदी, एनडीएचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल गुरुचरणसिंह, दक्षिणी मुख्यालयाचे प्रमुख जनरल धीरज सेठ या वेळी उपस्थित होते. पहाटेच्या रम्य वातावरणात बिगुल वाजल्यानंतर विविध सुरावटींवर संचलन करत लष्करी बँडचे खेत्रपाल मैदानावर आगमन झाले. त्यानंतर हवाई दल प्रमुखांनी संचलनाचा आढावा घेतला.

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?

हेही वाचा : पुरंदर विमानतळाची ‘समृद्धी’च्या दिशेने पाऊले

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून छात्रांनी केलेल्या दिमाखदार संचलनाला चेतक हेलिकॉप्टर, सुखोई यासह पी ८ आय पोसायडन या लढाऊ विमानाने पहिल्यांदाच सलामी दिली. अंकित चौधरी या छात्राने संचलनाचे नेतृत्व केले. या संचलनात क्युबेक या महिलांचे पथकही सहभागी झाले होते.

हेही वाचा : अबब् ! २०० सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई… सरकारी कार्यालयात सांभाळून जा

हवाई दल प्रमुखांनी छात्रांना संबोधित करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तिन्ही वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अंकित चौधरी यांना राष्ट्रपती सुवर्ण पदक, युवराजसिंग चौहान यांना रौप्य पदक, जोधा थोंगजय मयो यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आले.

Story img Loader