पुणे :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर आहेत. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज पुण्यात काही राजकीय पक्षांनी निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची तीन पुस्तके भेट दिली. शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, शिवाजी कोण होता आणि शिवछत्रपती एक मागोवा ही तीन पुस्तके त्यांना भेट देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/12/राज्यपालांच्या-भेटीनंतर-राष्ट्रवादी-काँग्रेस-पुणे-शहराध्यक्ष-प्रशांत-जगताप-यांची-प्रतिक्रिया.mp4

“राज्यपालांनी पश्चात्ताप व्यक्त केला. माझ्याकडून अवधनाने चूक झाली आहे, महाराष्ट्राला समजून घेण्यात मी कमी पडतोय “, असं राज्यपालांनी शिष्टमंडळासमोर म्हटल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घ्यावे आणि मगच बोलावे अशी भूमिका राज्यपालांसमोर शिष्टमंडळाने मांडल्याचा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी केला. राज्यपालांच्या भेटीनंतर ही सर्व माहिती जगताप यांनी प्रसारमाध्यमांना दिली. दरम्यान राज्यपालांची झालेली भेट आणि त्यांनी व्यक्त केलेली भूमिका यामुळे आमचे समाधान झाले नसून जोपर्यंत ते माध्यमांसमोर, जनतेसमोर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधातले आंदोलन हे सुरुच रहाणार असल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा… “शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”, शिंदे गटाचा खोचक टोला; कवितेतून ठाकरे गटालाही केलं लक्ष्य!

दरम्यान पुण्यात राजभवन ते यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी स्थळापर्यन्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात राज्यपालांविरोधात आंदोलन करत असताना ताब्यात घेण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune nationalist congress party claimed that the governor expressed regret in the case of his statement on shivaji maharaj kjp 91 asj