सासरच्या छळामुळे नवविवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – धावत्या रेल्वेत तरुणीवर लैंगिक अत्याचार, मावस भावाला दहा वर्षांची सक्तमजुरी

सुधाराणी संदीप वाघे (वय २४, रा. आशियाना ड्रीम सोसायटी, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत सुधाराणीचा भाऊ सिद्धलिंग कुसनेरे (वय १९, रा. नागराळ, जि. बिदर, कर्नाटक) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुधाराणीचा संदीप वाघेशी मार्च महिन्यात विवाह झाला. विवाहानंतर सासरकडील मंडळींनी तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. स्वयंपाक नीट जमत नाही, असे सांगून तिचा छळ सुरू करण्यात आला तसेच माहेरहून पैशांची मागणी करण्यात आली. सासरकडील छळामुळे तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

छळामुळे बहिणीने आत्महत्या केल्याचे सुधाराणीचा भाऊ सिद्धलिंगने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणात पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संतोष खेतमाळस तपास करत आहेत.