लोणावळा : मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रदीर्घकाळ ठसा उमटविणारे, अध्यात्मिक व कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व, माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे (वय ७५) यांचे गुरुवारी दुपारी हृहयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

हेही वाचा >>> पिंपरीः चिंचवडला शनिवारपासून मोरया गोसावी महोत्सव

त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, मुलगा मनोहर आणि प्रशांत, तीन मुली, पुतण्या तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.  इंदोरी गावचे उपसरपंच म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य, मावळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती, भाजपाचे -जिल्हाध्यक्ष आणि दोन वेळा मावळ तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. दिगंबर भेगडे हे मावळातून भाजपच्या तिकिटावर १९९९ व २००४ च्या सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. भेगडे  यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.

Story img Loader