Latest News in Pune Today : राज्यातील सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आणि परिसरात वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे वाढते गुन्हे, प्रदुषण, पाणी टंचाई, वाहतुक कोंडी अशा प्रकारच्या विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा पुणे शहर, परिसर तसेच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत…

Live Updates

Pune Maharashtra News 10 March 2025

18:20 (IST) 10 Mar 2025

घोड धरणातील गाळ काढण्याच्या नावाखाली धरणातील वाळु उपसा करण्यासाठी लिलाव करण्यास हरकत; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे

शिरुर: घोड धरणातील गाळ काढण्याच्या नावाखाली धरणातील वाळु उपसा करण्यासाठी लिलाव करण्यास हरकत असून या संदर्भात जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन दिले असल्याची माहिती संजय पाचंगे यांनी दिली .त्यांनी सांगितले की  शिरुर तालुक्यात घोड धरण हे अतिशय जुने असुन धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळुचा साठा साठलेला आहे.

सविस्तर वाचा

18:19 (IST) 10 Mar 2025

जेजुरीच्या खंडोबा गडावर भाविकांना तोकडे कपडे घालून येण्यास मनाई ; श्री मार्तंड देवसंस्थान समितीचा निर्णय

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आता भाविकांना तोकडे कपडे घालून आल्यास प्रवेश दिला जाणार नाही. पुरुष व महिला भाविकांना आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे .राज्यातील अनेक देवस्थानांनी  यापूर्वीच ड्रेस कोड लागू केले आहेत .त्याचप्रमाणे जेजुरीच्या खंडोबा गडावर सुद्धा आता ड्रेस कोड लागू झाला आहे .

सविस्तर वाचा

16:59 (IST) 10 Mar 2025

खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडी नंतर अध्यक्ष उपाध्यक्षाचा निवडी बाबत उत्सुकता

शिरुर: शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या  संचालकपदाच्या निवडणुकीच्या निकाला नंतर खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी आमदार ज्ञानेश्वर कटके गटाचा  की माजी आमदार अशोक पवार गटाच्या उमेदवाराची वर्णी लागणार याकडे राजकिय वर्तूळाचे लक्ष लागले आहे . शिरूर  तालुका खरेदी विक्री संघ संचालक मंडळाच्या १७ जागांची  पंचवार्षिक निवडणूक झाली .

सविस्तर वाचा

16:14 (IST) 10 Mar 2025

पर्यटकांना अनुभवता येणार खाणीतला थरार

नागपूर : खनिज संपत्तीसाठी राज्यात अनेक ठिकाणी खाणी तयार करण्यात आल्या आहेत. या खाणीत काम करणारे कामगार दररोज स्वत:चा जीव धोक्यात घालूनच काम करत असतात. सुरक्षेत थोडीही गडबड झाली तरीही जीव गमवावा लागतो. अशा अनेक घटना घडल्या देखील आहेत. विदर्भात अलीकडेच खाणीतील कामगारांचा स्वत:चा जीव गमवावा लागला आहे.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 10 Mar 2025

शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथील क्रीडा सुविधांचे नूतनीकरण करणार - अर्थसंकल्पात घोषणा

16:12 (IST) 10 Mar 2025

शिवसृष्टी प्रकल्पासाठी अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा....

येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

15:52 (IST) 10 Mar 2025

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट, २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल - अजित पवार</p>

15:51 (IST) 10 Mar 2025
पुणे मेट्रोसाठी अर्थसंकल्पात कोणती घोषणा करण्यात आली ?

पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-२ अंतर्गत खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या दोन मार्गिकांचा ९ हजार ८९७ कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. - अर्थमंत्री अजित पवार

15:49 (IST) 10 Mar 2025

पुणे ते शिरुर या ५४ किलोमीटर लांबीच्या ७ हजार ५१५ कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार, तळेगाव ते चाकण या २५ किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग- ६ हजार ४९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित... अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा.

15:48 (IST) 10 Mar 2025

टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड

पुणे : शहरात किरकोळ वादातून हाणामारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. लोहगाव भागातील फाॅरेस्ट पार्क सोसायटीत टोळक्याने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. तलवारी उगारुन टोळक्याने घरातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला.

सविस्तर वाचा

15:31 (IST) 10 Mar 2025

मुंबई, पुणे, नागपुरात मेट्रोचं जाळं तयार होणार; ‘या’ नव्या मार्गिकांना मंजुरी, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती

aharashtra Budget 2025 Ajit Pawar : मुंबई, नागपूर व पुणे या तीन शहरांमध्ये राज्य सरकाकडून अनेक मेट्रो मार्गिकांचं काम चालू आहे. तर, या तिन्ही शहरांत मेट्रोच्या काही मार्गिका चालू आहेत. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी सरकार काही नव्या मेट्रो मार्गिकांचं बांधकाम सुरू करणार आहे.

सविस्तर वाचा...

15:31 (IST) 10 Mar 2025

चांगला मेकअप करून कार्यक्रमात मटकायचं : रोहिणी खडसे

पुणे : राज्यातील महिला वर्गावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असून राज्य सरकारने महिलांना संरक्षण द्यावे,या मागणीसाठी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

वाचा सविस्तर...

13:00 (IST) 10 Mar 2025

उष्माघाताच्या धोक्यात वाढ! राज्य सरकारकडून विशेष उपाययोजना सुरु

पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उष्माघाताच्या धोक्यात वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत उष्माघाताच्या चार रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित आपत्कालीन उपचारांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा....

12:01 (IST) 10 Mar 2025

पुणे : दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती, वारजे पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

पुणे : दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या एकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वारजे भागातील रामनगर परिसरात रविवारी ही घटना घडली.

सविस्तर वाचा...

11:42 (IST) 10 Mar 2025

विद्यापीठांतील विभागांच्या मूल्यांकनाचा निर्णय… आता होणार काय?

पुणे : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) राज्यातील विद्यापीठांची पीछेहाट झाल्याने आता विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठ विभाग क्रमवारी आराखडा (यूडीआरएफ) तयार करण्यात आला आहे. त्यात विद्यापीठातील विभागांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून विभागांची क्रमवारी जाहीर केली जाणार आहे.

सविस्तर वाचा...

11:28 (IST) 10 Mar 2025

दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम; ३० जूनपर्यंत अंमलबजावणी

पुणे : राज्यातील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी शाळांना ३० जूनपर्यंत करावी लागणार असूून, भाषा आणि गणित या विषयांसाठीच्या अध्ययन क्षमता साध्य करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

सविस्तर वाचा....

10:58 (IST) 10 Mar 2025

पुणे : नशेसाठी औषधांचा वापर; दोन तरुण गजाआड, हडपसर भागात कारवाई

पुणे : नशेसाठी औषधांचा वापर करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अमली पदार्थांचे सेवन परवडत नसल्याने अनेक तरुण नशेसाठी औषधांचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. हडपसर पोलिसांनी तरुणांना नशा येणारी औषधांची विक्री केल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली.

सविस्तर वाचा....

10:28 (IST) 10 Mar 2025

पुणे : ‘राष्ट्रवादी’च्या आंदोलनाचा मेट्रोला फटका

पुणे : सुशिक्षित पदवीधर तरुणांना रोजगार मिळावा आणि अन्य मागण्यांसाठी कोणतीही पूर्वकल्पना न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) कसबा मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी रविवारी मेट्रोच्या रुळावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे मेट्रोच्या प्रवासी सेवेला फटका बसून सेवा दोन तास विस्कळीत झाली. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

सविस्तर वाचा....

09:25 (IST) 10 Mar 2025

सरकारची भूमिका चीनच्या फायद्याची, लडाखमधील समस्येवरून वांगचूक यांची टीका

पुणे : ‘लडाखच्या लोकांनी सरकारला जनाधार देऊनही उद्योगांच्या नावाखाली स्थानिक गुराख्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा डाव आखला गेला. लडाखमधील गुराख्यांवर अन्याय करणारी सरकारची भूमिका चीनच्या फायद्याची आहे,’ अशी टीका पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी केली.

सविस्तर वाचा...

09:09 (IST) 10 Mar 2025

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’त विजयानंतर पुण्यात जल्लोष

पुणे : ‘चॅम्पियन्स ट्राॅफी’त अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर शहरभर जल्लोष करण्यात आला. जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील गोखले स्मारक चौकात तरुणाईने जल्लोष करून विजय साजरा केला.

सविस्तर वाचा.....

08:48 (IST) 10 Mar 2025

…म्हणून महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही; राज ठाकरे यांच्या उपस्थितीत साहित्यिकाचे मोठे विधान

पिंपरी : ‘इतिहासात महाराष्ट्राचा दृष्टिकोन व्यापक राहिला आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला, अशी आपण यशवंतराव चव्हाण यांची आठवण काढतो. असे अनेक प्रसंग आहेत. पण, जातिवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही. इतिहासात सर्व जाती एकत्र आल्या म्हणून विजय मिळाले. जातींचे ऐक्य नष्ट झाले, की राज्य संपते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा....

Pune News Live Today in Marathi

Pune News Live Updates : पुणे शहर आणि जिल्ह्यातील महत्वाच्या सर्व घडामोडी एका क्लिकवर…