Latest News in Pune Today Live: महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील ताज्या घडामोडी आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पुणे जिल्ह्याचा वेगाने होत असलेला विस्तार व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून पुण्यात होणारे स्थलांतर यांमुळे जिल्ह्यात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडमधील ताज्या घडामोडी लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…
Pune News LIVE Updates : पुणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...
समाज माध्यमात झालेली ओळख महागात; पर्वती परिसरात तरुणाला २५ हजारांना लुटले
पुणे : समाज माध्यमातील एका मैत्रीविषयक ॲपवर झालेली ओळख मसाज थेरपिस्टला महागात पडली. पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्याने त्याच्याकडील २५ हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पर्वती पायथा परिसरात नुकतीच घडली.
गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला हटकल्याने पोलीस शिपायाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना सदाशिव पेठेत घडली.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयास ‘कर्मवीर काव्य करंडक’
राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धेत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत २०२५ च्या कर्मवीर काव्य करंडकावर नाव कोरले.
पुणे: शाळकरी मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांना सक्तमजुरी
आरोपी महिला आणि साथीदारांनी एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीला पुण्यात चांगले शिक्षण देण्याचे आमिष दाखवून तिला गावाहून आणले होते.
पुणे : शहरातील रस्त्यांवर चार हजार बेवारस वाहने असून, येत्या १५ दिवसांमध्ये येथील सर्व बेवारस वाहने हटवली जाणार आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियाना’च्या माध्यमातून गणेश पेठेतील दूधभट्टी चौकामध्ये बेवारस वाहने हटविण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., झोन एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह कसबा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
पुणे : चाकण मधील बहुळ येथे दरोडेखोर आणि पोलीस एकमेकांसमोर आले. पोलिसांनी स्व:रक्षणासाठी केलेल्या गोळीबारामध्ये एक दरडोखोर जखमी झाला आहे. पोलिसांवर देखील दरोडेखोरांनी हल्ला केला यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री घडली आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी चिंचोशी गावात दरोडा टाकणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सविस्तर वाचा...
पुण्यात घरांच्या विक्रीला घरघर का? जाणून घ्या घसरणीची कारणे…
नाइट फ्रँक इंडियाने पुण्याच्या मालमत्ता क्षेत्राचा जानेवारी महिन्याचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, जानेवारीमध्ये १६ हजार ३३० घरांची विक्री झाली.
स्वारगेट प्रकरणात आरोपी गाडेच्या मोबाइलची तांत्रिक तपासणी
पोलिसांनी गाडेसह शिवशाही बसचा चालक, वाहक यांचे जबाब नोंदविले आहे. गाडेची ससून रुग्णालयात डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा...
सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचे काम रखडल्याचा परिणाम उजनी धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. उन्हाळ्यात पाणीसाठा अजून कमी होणार असून जलपुरवठ्याचे नियोजन कसे करायचे याची चिंता भेडसावत आहे.
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स