Latest News in Pune Today : पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील वार्षिक बाजारमूल्य दरामध्ये (रेडिरेकनर) वाढ झाली आहे. पुण्यात सरासरी ४.१६ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यापेक्षा पिंपरी-चिंंचवड महापालिका क्षेत्रातील घरांचे आणि जमिनींचे दर चढे राहणार आहेत. तर पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील खुंबरेनगर येथे मोटार चालकाने दुचाकीला धडक देऊन काही अंतर फरफटत नेले. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तेव्हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, परिसर तसंच जिल्ह्यातील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल….

Live Updates

Pune Maharashtra News Today, 1 April 2025

15:06 (IST) 1 Apr 2025
'स्वये श्री..‌. ' हे आधी गीतरामायणाचे पहिले गीत नव्हतेच!…. वाचा या गीताच्या जन्माची कहाणी गीतरामायणाच्या सप्तदशकपूर्तीनिमित्त…
‘स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती’ या ‘गीतरामायणा’तील पहिल्या गीताचे आकाशवाणी पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ रोजी प्रसारण झाले. त्या घटनेला मंगळवारी ७० वर्षे पूर्ण होत आहेत. ...Read More
14:39 (IST) 1 Apr 2025
मुतखड्याच्या त्रासातून आता मुक्तता! अत्याधुनिक ‘लेझर’ पद्धतीद्वारे जलद उपचार अन् रुग्णही लवकर बरा
रेट्रोग्रेड इंट्रारीनल सर्जरी (आरआयआरएस) ही कमीत कमी चिरफाड करणारी एंडोस्कोपी प्रक्रिया असून, याचा उपयोग अगदी अचूकपणे मूत्रपिंडातील खडे काढण्यासाठी केला जातो. ...Read Full Details
13:51 (IST) 1 Apr 2025

पुणे : महापालिकेला भरघोस उत्पन्न, मात्र उद्दिष्टपूर्ती नाहीच!

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे १०० कोटी रुपयांनी वाढ झाली असली, तरी उद्दिष्टपूर्ती साध्य करता आलेली नाही.

सविस्तर वाचा...

12:57 (IST) 1 Apr 2025
पुणे : किराणा आणायला गेला अन् अपघातात जीव गमावला, तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
अपघातानंतर कंटेनरचालक चंद्रप्रकाश यादव हा घटनास्थळी न थांबता पळून जात होता. ...Read Full Details
12:52 (IST) 1 Apr 2025

शिखर संस्थेच्या माध्यमातून आता व्यावसायिक अभियंत्यांची नोंदणी, ‘एआयसीटीई’कडून मसुद्यावर हरकती-सूचनांसाठी १० एप्रिलपर्यंतची मुदत

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ‘इंडियन प्रोफेशनल इंजिनिअर्स कौन्सिल’च्या विधेयकाचा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यावर १० एप्रिलपर्यंत हरकती-सूचना मागवण्यात आल्या आहेत.

सविस्तर बातमी...

12:50 (IST) 1 Apr 2025

चाकणमध्ये मोटार चालकाने दुचाकीस्वाराला नेले फरफटत

पिंपरी : पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील खुंबरेनगर येथे मोटार चालकाने दुचाकीला धडक देऊन काही अंतर फरफटत नेले. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

सविस्तर बातमी...

12:48 (IST) 1 Apr 2025

पुणे : वेताळ टेकडी फोडल्यास शहरातील भूजल धोक्यात? जलव्यवस्थापन तज्ज्ञ सतीश खाडे यांचे मत

पुणे : ‘वेताळ टेकडी फोडून पौड रस्ता-बालभारती रस्त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या नियोजित भुयारी मार्गामुळे बशीच्या तळाशी येणारे पाणी तिथेच साचून राहील. या मार्गासाठी करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे जमिनीतल्या आतल्या भेगांचे प्रवाह नष्ट होतील. त्यामुळे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होणार असून, शहरातील भूजल धोक्यात येईल,’ असे मत जलव्यवस्थापन तज्ज्ञ सतीश खाडे यांनी शनिवारी व्यक्त केले.

अधिक माहितीसाठी...

12:46 (IST) 1 Apr 2025

Ready Reckoner Rate : पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडमधील दर चढे, रेडिरेकनरच्या दरात पुण्यात ४.१६ टक्के, पिंपरीमध्ये ६.६९ टक्के वाढ

पुणे : पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील वार्षिक बाजारमूल्य दरामध्ये (रेडिरेकनर) वाढ झाली आहे. पुण्यात सरासरी ४.१६ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यापेक्षा पिंपरी-चिंंचवड महापालिका क्षेत्रातील घरांचे आणि जमिनींचे दर चढे राहणार आहेत.

सविस्तर बातमी...

12:46 (IST) 1 Apr 2025

स्व-मालकीच्या ‘पीएमपी’साठी मुहूर्त लागेना, मोडकळीतील बसमधून प्रवास

पुणे : आर्थिक वर्ष संपले तरी, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात स्व-मालकीच्या २०० बस खरेदी करण्याचा मुहूर्त लागलेला नाही. तसेच खासगी तत्वावरील बस ताफ्यात दाखल होण्याची प्रक्रियाही विलंबाने होत आहे. त्यामुळे आयुर्मान संपलेल्या २८३ बस अद्यापही शहरातील विविध ररस्त्यांवरून धावत आहेत.

वाचा सविस्तर...

12:44 (IST) 1 Apr 2025

अखेर वर्षभरानंतर पुणे-मुंबई मार्गावरील ‘शिवशाही’ धावली, एसटी महामंडळाने केले ‘असे’ नियोजन

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) ताफ्यात ४० नवीन ‘लालपरी’ दाखल झाल्या आहेत. परिणामी एसटी’महामंडळाकडून वातानुकुलित ई-बसचे नियोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या पुणे-मुंबई या मार्गावर धावणाऱ्या ई-बस (शिवशाही -वोल्व्हो) सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

12:43 (IST) 1 Apr 2025

किरकोळ अपघातानंतर चावी काढून घेणे महागात, टेम्पो चालकाला धमकाविल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गु्न्हा

पुणे : एनडीए रस्त्यावरील शिवणे औद्योगिक वसाहतीत एका मालवाहून टेम्पोचालकाला किरकोळ अपघात घडल्यानंतर मारहाण करून वाहनाची चावी काढून घेण्यात आली आणि नुकसानभरपाईपोटी संबंधिताने दहा हजारांची मागणी केली. या प्रकरणी टेम्पोचालकाला धमकावून चावी काढून घेणे, तसेच त्याला मारहाण केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सविस्तर बातमी...

12:41 (IST) 1 Apr 2025

श्री संत तुकाराम महाराज संस्थानची निवडणूक चुरशीची; अध्यक्षपदी जालिंदर मोरे विजयी

श्री क्षेत्र देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्तांची निवडणूक प्रक्रिया  सोमवारी (३१ मार्च) येथील पित्ती धर्मशाळेत पार पडली.

सविस्तर वाचा...

Pune News Today in Marathi

पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स