Latest News in Pune Today : पुणे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने पुणे शहरावर तसंच परिसरातील गावांवर नागरी सुविधांचा ताण वाढत असून वाहतूक समस्याही वाढल्या आहेत. अशा घडामोडी तसंच पुणे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय, गुन्हे विषयक बातम्या या live blog च्या माध्यमातून वाचता येतील.
Pune Maharashtra News LIVE Today, 11 march 2025
मसाज पार्लरमधील महिलेकडून खंडणी उकळणारे तिघे गजाआड, चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
पुणे : धनकवडी भागातील एका आयुर्वेदिक मसाज पार्लरमधील महिलेला धमकावून खंडणी उकळणाऱ्या तिघांना सहकारनगर पाेलिसांनी गजाआड केले. आरोपींनी मसाज पार्लरमधील महिलांना धमकावून खंडणी उकळण्याचे सात ते आठ गुन्हे केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे.
आकुर्डीतील महाविद्यालयात आरडीएक्स विस्फोटक ठेवल्याचा ई-मेल
पिंपरी : आकुर्डी येथील डी वाय पाटील महाविद्यालय परिसरात आरडीएक्स विस्फोटक पेरले असून परिसरात मोठा स्फोट घडवून आणला जाणार असल्याचा ई-मेल महाविद्यालय प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांची आणि महाविद्यालय प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबविली. खोडसाळपणे हा मेल केला असल्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा...
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हडपसर, तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.
आता सोसायटीधारक ठरवणार आवारात बीअर शॉप हवे की नको; अजित पवार यांची माहिती
पिंपरी : गृहनिर्माण सोसायटी, शाळा, धार्मिक स्थळे, रुग्णालयासह रहिवाशी क्षेत्रात वाईन शॉप, बीअर शॉप, बार आणि रेस्टॉरंट परवानगी देताना सोसायटीची ‘एनओसी’ बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
बालभारती- पौड फाटा रस्त्याबाबत पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !
पुणे : विधी महाविद्यालय, प्रभात रस्ता तसेच कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाचा असलेला बालभारती ते पौड फाटा रस्ता तातडीने तयार व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी वन विभागाची मान्यता घेण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. यासाठी वन खात्याला पत्र दिले जाणार आहे.
पुणे : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावर चार ठिकाणी क्लोरिन यंत्रणा !
पुणे : पुण्यात गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) चे रुग्ण आढळले होते. सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी, खडकवासला, नांदोशी, नांदेड यासह आजूबाजूच्या परिसरात या आजाराचे अनेक रुग्ण सापडले होते. दूषित पाणी प्याल्याने या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने समोर आल्यानंतर आवश्यक ती उपाययोजना करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
प्रादेशिकतेकडे समावेशक दृष्टिकोनातून पाहायला हवे, प्रा. प्राची देशपांडे यांचे मत
पुणे : ‘आकलन संस्थे’तर्फे एस. एम. जोशी प्रतिष्ठानच्या रामकृष्ण मुंडकर सभागृहात आयोजित प्राध्यापक राजेंद्र व्होरा स्मृतिव्याख्यानात ‘रायटिंग अ रिजन इन इंडियन हिस्ट्री’ या विषयावर प्रा. प्राची देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
पुणे : सायबर चोरट्यांकडून एक कोटींची फसवणूक, आमिषांच्या जाळ्यात सामान्य नागरिक
पुणे: शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून सायबर चोरट्यांकडून सामान्यांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत तक्रारदारांची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजनिमित्त देहूतील मंदिरात सर्वांत मोठ्या पगडीचे लोकार्पण
जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त पाच फूट उंच आणि ३० फुटांचा घेर असलेली पगडी तुकोबाचरणी अर्पण करण्यात आली. ही जगातील सर्वांत मोठी पगडी असल्याचा दावा केला जात आहे. याची दखल वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया आणि जीनियस बुकने घेतली आहे.
अतिरिक्त आयुक्त चंद्रन यांच्याकडे इतक्या खात्यांची जबाबदारी!
महापालिकेच्या अतिरिक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्याकडे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिरिक्त आयुक्त (जनरल) पदाचा कार्यभार दिला आहे. त्यांच्याकडे १८ विभागांची जबाबदारी असणार आहे. सविस्तर वाचा…
अंदाजपत्रकात बदल करा, अन्यथा न्यायालयात जाणार ! कोणी दिला इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या आठवड्यात पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी देखील २०२५- २६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले आहे. सविस्तर वाचा
अंदाजपत्रकात बदल करा, अन्यथा न्यायालयात जाणार ! कोणी दिला इशारा
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या आठवड्यात पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी देखील २०२५- २६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले आहे. मागील अंदाजपत्रकात एक हजारापेक्षा अधिक कोटी रुपयांची वाढ करून महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी १२ हजार ६१८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे.
शहरबात… घटना हे निमित्त; अपप्रवृत्ती ठेचा!
गौरव आहुजा नावाच्या एका तरुणाने भर चौकात लघुशंका केल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील अहोरात्र गजबलेल्या शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध आलिशान मोटार थांबवून आहुजाने हे लज्जास्पद कृत्य केले.
पिंपरी-चिंचवडकरांचे श्वास कोंडलेले, घसे तहानलेले
नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा ‘लोकसत्ता’चा हा पुढाकार.
पुणे : नऊ जणांना पोलीस कोठडी, मेट्रो मार्गावरील आंदोलनाच्या सूत्रधाराचा शोध
पुणे : महापालिका भवन मेट्रो स्थानक परिसरात आंदोलन करणाऱ्या नऊ जणांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले. या प्रकरणातील उर्वरित आठ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मेट्रो मार्गावर आंदोलन प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
पुणे : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
पुणे : शनिवार पेठेतून दुचाकी चोरुन पसार झालेल्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन दुचाकी, दोन दूरचित्रवाणी संच, मोबाइल, लॅपटाॅप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्याने विश्रामबाग, सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, तसेच लोणावळा शहरात दुचाकी चोरी, तसेच घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले.
जातवैधता प्रमाणपत्रांची ४७ हजार प्रकरणे प्रलंबित
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (बार्टी) राज्यातील ३६ जात पडताळणी समित्यांमधील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचा फटका जातपडताळणी प्रक्रियेला बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्य:स्थितीत जातवैधता प्रमाणपत्रांची तब्बल ४७ हजार प्रकरणे प्रलंबित असून, अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याचे समोर आले आहे.
पुणे : नऊ जणांना पोलीस कोठडी, मेट्रो मार्गावरील आंदोलनाच्या सूत्रधाराचा शोध
पुणे : महापालिका भवन मेट्रो स्थानक परिसरात आंदोलन करणाऱ्या नऊ जणांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले. या प्रकरणातील उर्वरित आठ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मेट्रो मार्गावर आंदोलन प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचे ओझे कमी… शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
पुणे : राज्यभरातील शाळांतील शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रारूप तयार करण्यात आले असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षकांना शैक्षणिक वेळापत्रक दिले जाणार आहे.
पुणे : ६० लाख ३६ हजार रुपये किमंतीची अवैधरित्या विनापरवाना दारु घेवून जाणारा टेम्पो व दारु पोलीसांकडून जप्त
शिरुर : शिरुर पोलीसांनी गोवा बनावटीची ६० लाख ३६ हजार रुपये किमंतीची अवैधरित्या विनापरवाना दारु व ही दारु घेवून जाणारा १५ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ७५ लाख रुपयांचा माल जप्त केला असून वाहनचालकास अटक करण्यात आली आहे.
‘आरटीई’ कोट्यातून ६४ हजार प्रवेश; रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपुष्टात आली. त्यानुसार, सोमवारी रात्रीपर्यंत ६४ हजार ४८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
‘आरटीई’ कोट्यातून ६४ हजार प्रवेश; रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपुष्टात आली. त्यानुसार, सोमवारी रात्रीपर्यंत ६४ हजार ४८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
सविस्तर वाचा...
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स