Latest News in Pune Today Live : पुणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणे शहरावर तसंच परिसरातील गावांवर नागरी सुविधांचा ताण वाढत असून वाहतूक समस्याही वाढल्या आहेत. अशा घडामोडी तसंच पुणे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय, गुन्हे विषयक बातम्या या live blog च्या माध्यमातून वाचता येतील.

Live Updates

Pune Maharashtra News LIVE Today, 12 March 2025

18:54 (IST) 12 Mar 2025

धावत्या रेल्वेवर फुगे फेकल्यास कारवाईचा बडगा, लोहमार्ग पोलिसांची गस्त

पुणे : धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास कारवाई करण्याचा इशारा लोहमार्ग पोलिसांनी दिला आहे. होळी, तसेच धुलीवंदनानिमित्त लोहमार्ग पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी...

18:38 (IST) 12 Mar 2025

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची येरवडा कारागृहात रवानगी

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार गाडेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी...

18:01 (IST) 12 Mar 2025

शिरूर : कंटेनर इलेक्ट्रीक पोलला धडक, १ लाख रुपयांचे नुकसान

शिरूर : पार्सल कंपनीतून पार्सल माल भरुन कोईमतूर येथे चालेल्या कंटेनरने शिरुर चौफुला रस्त्यावर कर्डे गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरचे डिझेल सांडून लागलेल्या आगीत कंटेनर व कंटेनर मधील पार्सल जळून खाक झाले. एकूण २१ लाख रु. चे नूकसान झाले आहे याबाबत कंटेनर चालकाचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

यासंदर्भात हेमंत दिलीप वानखेडे वय ३५र्षे, व्यवसाय वायरमन रा बाबुराव नगर, शिरूर ता. शिरूर, जि. पुणे यांनी कंटेनर चालक कुप्पुरवामी आर. रामलिंगम रा. ईराबड़ी राको गाव ता. बोप्पीरेपटटी जि. धर्मापुरी राज्य तमिळनाडू यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

17:58 (IST) 12 Mar 2025

शिरूर : विक्रीकरीता गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी एकास अटक

शिरूर : बेकायदेशीर पणे ३ किलो ८४० ग्रॅम वजनाचा ३८.८४० /-रू. किमंतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता जवळ बाळगल्या प्रकरणी समीर हजरत शेख वय ३० वर्ष, रा. जांबुत, ता. शिरूर जि. पुणे याचावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की समीर हजरतअली शेख हा त्याचे राहते घराचे अवतीभोवती परिसरात गांजा अंमली पदार्थ बाळगुन त्याची ओळखीचे लोकांना विक्री करीत आहे . त्यानुसार शेख यांचे राहते घरी सापळा रचुन छापा टाकला असता समीर शेख यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ३ किलो ८४० ग्रॅम तयार वजनाचा गांजा असा एकुण ३८,८४०/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. समीर हजरत अली शेख वय ३० वर्षे रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे याचे विरूध्द पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६९/२०२५ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

17:51 (IST) 12 Mar 2025

बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि कुटुंबीयांचे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्यात नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमाचे आयोजन काल मंगळवारी ( ता. ११ मार्चला ) करण्यात आले होते. बारामती तालुका पोलीस स्टेशन, बारामती हॉस्पिटल तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस कर्मचारी आणि कुटुंबीयांची आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या रक्तदान आणि आरोग्य शिबिरा मध्ये लठ्ठपणाची तपासणी, डोळ्याची तपासणी,शरीरातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब तपासनी,ऑक्सिजनची पातळी तपासणी तसेच आरोग्य विषयक मोफत तपासण्या करण्यात आल्या.

17:48 (IST) 12 Mar 2025

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक

पुणे : गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी...

17:47 (IST) 12 Mar 2025

साडेचार दशकांनंतर ‘छावा’ आता इंग्रजीतही, उदंड मागणीमुळे कादंबरीचा अनुवाद अमराठी वाचकांसाठी खुला

पुणे : ‘छावा’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर देशभरातील वाचकांकडून होत असलेल्या मागणीमुळे तब्बल साडेचार दशकांनंतर ‘छावा’ कादंबरी इंग्रजी अनुवादाच्या माध्यमातून अमराठी वाचकांसाठी खुली झाली आहे.

सविस्तर बातमी...

16:25 (IST) 12 Mar 2025

लोकशाही सुदृढ होण्याबरोबरच प्रत्येकाचे अर्थकारण सबळ होणे गरजेचे – कृषिलोक विकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक

शिरुर : लोकशाही सुदृढ होण्याबरोबरच प्रत्येकाचे अर्थकारण सबळ झाले पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व कृषिलोक विकास संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक रवींद्र धनक म्हणाले.

सविस्तर वाचा....

15:42 (IST) 12 Mar 2025

वीजनिर्मितीच्या जुन्या प्रकल्पाला नावीन्यपूर्ण दाखवून पुणेकरांना ‘धक्का’

पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकात पुणेकरांसाठी नवनवीन योजना आखल्याचे दाखविण्यासाठी जुनाच प्रकल्प नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणून दाखविल्याचा प्रताप महापालिकेच्या घनकचरा विभागाने केल्याचे उघडकीस आले आहे. कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सात वर्षापूर्वीपासून प्रलंबित असताना महापालिकेच्या २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात याच प्रकल्पाला नावीन्यपूर्ण प्रकल्प दाखवून महापालिका प्रशासनाने पुणेकरांना ‘धक्का’ दिला आहे.

सविस्तर वाचा....

15:14 (IST) 12 Mar 2025

पुणे : सिंहगड रस्त्यावरील ४३ आरओ प्रकल्पांना पुन्हा टाळे?

पुणे : शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चा प्रादुर्भावानंतर महापालिकेने खासगी पद्धतीने पाणी शुद्ध करून त्याची विक्री करणाऱ्या (आरओ) प्रकल्पांसाठी नियमावली लागू केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील ४३ आरओ प्रकल्पांना महापालिकेने टाळे ठोकले आहे.

सविस्तर वाचा....

15:07 (IST) 12 Mar 2025

वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर ‘लक्ष्य’, काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्षाकडून आरोप

पुणे : काँग्रेसचा ‘हात’ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेस आणि शिवसेनेने (ठाकरे) लक्ष्य केले आहे. वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेची शक्यता असल्यानेच ते सत्तेच्या जवळ गेले आहेत, अशी टीका शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली, तर भीती आणि आमिषापोटीच धंगेकर शिवसेनेत गेल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

सविस्तर वाचा....

14:56 (IST) 12 Mar 2025

पुणे : महावितरणचे वडगाव शाखा कार्यालय नव्या जागेत

पुणे : महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत वडगाव शाखा कार्यालयाचे वडगावमधील मध्यवस्तीत स्थलांतर करण्यात आले असून, कार्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सविस्तर वाचा....

14:33 (IST) 12 Mar 2025

पुणे : पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव २१ मार्चला

पुणे : आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित देशभरातील संगीत महोत्सवात मानाचे स्थान प्राप्त केलेला पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव यंदा २१ ते २३ मार्चदरम्यान होणार आहे.

सविस्तर वाचा....

14:26 (IST) 12 Mar 2025

पुणे : पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव २१ मार्चला

पुणे : आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित देशभरातील संगीत महोत्सवात मानाचे स्थान प्राप्त केलेला पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव यंदा २१ ते २३ मार्चदरम्यान होणार आहे.

सविस्तर बातमी...

14:26 (IST) 12 Mar 2025

पिंपरी चिंचवडमधील किती अनधिकृत शाळा बंद? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती…

पुणे : राज्यातील ३८८ खासगी शाळा अनधिकृतरीत्या चालवल्या जात असल्याचे असल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात दिली. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील २२ अनधिकृत शाळांपैकी ११ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

वाचा सविस्तर...

14:25 (IST) 12 Mar 2025

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावून चोरटे पसार, विश्रामबाग वाड्याजवळील घटना

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाकडील मोबाइल संच हिसकावून नेण्यात आल्याची घटना विश्रामबाग वाड्यासमोर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर बातमी...

14:23 (IST) 12 Mar 2025

मटण सर्टिफिकेशनच्या नावावरून मतभेद : काय आहेत खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांच्या भूमिका?

जेजुरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण सर्टिफिकेटला ‘मल्हार सर्टिफिकेशन’ नाव देण्याची घोषणा वादात सापडली आहे. जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये या निर्णयावरून मतभेद झाले आहेत.

सविस्तर वाचा...

14:22 (IST) 12 Mar 2025

तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त देहू मधील वाहतुकीत बदल

पिंपरी : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी (१६ मार्च) साजरा होत आहे. त्यानिमित्त राज्यभरातून भाविक देहू येथे येतात. वाहनांच्या गर्दीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देहू आणि परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी...

14:22 (IST) 12 Mar 2025

पतीचा खून, महिलेसह प्रियकर गजाआड

पुणे : भोर तालुक्यातील सारोळे गावात नदीपात्रात सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्यातील पथकाकडून करण्यात आलेल्या तपासात अनैतिक संबधातून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर बातमी...

14:21 (IST) 12 Mar 2025

एचएसआरपी केंद्रच बंद झाल्याने पाटी कोरी…वाहनचालकांचा मनस्ताप

पुणे : जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एसएसआरपी) बसविणारी दोन अधिकृत केंद्रे कुठलीच पूर्वकल्पना न देता बंद ठेवल्याने अनेक वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

सविस्तर वाचा...

14:20 (IST) 12 Mar 2025

‘ॲड. असीम सरोदे यांनी न्यायालयात बाजू मांडावी’, स्वारगेट प्रकरणातील पीडित तरुणीची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले. ’बलात्कार प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. असीम सरोदे यांची नियुक्ती करावी,’ अशी विनंती तिने निवेदनाद्वारे केली आहे.

वाचा सविस्तर...

14:19 (IST) 12 Mar 2025

पिंपरी : सल्लागार, वास्तुविशारद पॅनल रद्द; वाढत्या तक्रारींमुळे महापालिकेचा निर्णय

पिंपरी : महापालिकेतील विकासकामांकरिता सल्ला घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सल्लागार पॅनलबाबत तक्रारी वाढल्यामुळे अस्तित्वात असलेले सल्लागार आणि वास्तुविशारद पॅनल रद्द करण्यात आले आहे. पॅनल आणि वास्तुविशारद नव्याने नियुक्त करण्यात येणार, असून त्यासाठी महापालिकेने अर्ज मागविले आहेत.

सविस्तर वाचा...

14:19 (IST) 12 Mar 2025

‘पीएमआरडीए’च्या अंतर्गत ‘रिंग रोड’ला वेग, जिल्हाधिकाऱ्यांकडे १३ गावांमधील ११५ हेक्टर भूसंपादनाचा प्रस्ताव

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याला (इनर रिंग रोड) गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत १३ गावांमधील ११५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून, भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

14:18 (IST) 12 Mar 2025

पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत दोन वर्षांत, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू

पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. आयुक्तालयातील मुख्य इमारत वगळता अन्य विभागांची बैठी कार्यालये पाडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन वर्षांत सात मजली अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

सविस्तर वाचा...

14:17 (IST) 12 Mar 2025

फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा अटकेत, सायबर पोलिसांची कारवाई

पिंपरी : ‘इंस्टंट पे’, ‘एअर पे’, ‘स्पाईस मनी’ या ‘फिनटेक कंपन्यां’चा वापर करून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी ‘एअर पे’च्या कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा...

14:16 (IST) 12 Mar 2025

पिंपरीतील पाणी वापराचे ‘ऑडिट’ करा; जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

पिंपरी : महापालिकेला किती पाणी दिले जाते. त्याचा वापर कसा केला जातो, त्याचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत.

सविस्तर वाचा...

Pune News Live Today in Marathi

पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स

Story img Loader