Latest News in Pune Today : रात्री अपरात्री फटाक्यासारख्या आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलेटला बसविण्यात आलेले सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले. मिळकतकर भरण्यासाठी नोटिसा बजावूनदेखील मिळकतकर न भरल्यामुळे जप्त केलेल्या १०० मिळकतींचा पुणे महापालिकेकडून लिलाव केला जाणार आहे. या मिळकती मिळकतकर विभागाने गेल्या वर्षी जप्त केल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अशा घडामोडी तसंच मावळ आणि पुणे जिल्ह्याच्या इतर भागातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल…
Live Updates
Pune Maharashtra News Today, 17 April 2025
‘पीएमपी’च्या १२३ नवीन बस सदोष, सेवा संंचलनातून बस बंद; तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर मार्गिकांंवर
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या १२३ नव्या सीएनजी बस सदोष असल्याने त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल
बारा पंचनामे करण्यात आले असून, त्यामध्ये गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनितीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपीविरोधात भक्कम पुरावे सादर करण्यात आले आहेत. …अधिक वाचा
आणखी काही दिवस उष्मा कायम, उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती, २२ एप्रिलनंतर तापमानात घटण्याचा अंदाज
शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा, वाढलेला उष्मा असे वातावरण आणखी काही दिवस सहन करावे लागणार आहे. …सविस्तर वाचा
बाणेर-पाषाण लिंक रस्ता सहा महिन्यांत पूर्ण करा, मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिका, जिल्हा प्रशासनाला आदेश
बाणेर-पाषाण लिंक रस्त्याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. …सविस्तर वाचा
शहरबात… ‘कसब्या’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी…
भाजपच्या विद्यमान शहराध्यक्षांचा कालावधी संपत आला असताना भाजपपुढे शहराच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची, हा यक्षप्रश्न आहे. …अधिक वाचा
सातारा-पुणे महामार्गावर खासगी बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली
पुणे-सातारा महामार्गावर गुरुवारी दुपारी भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळ एका खासगी कंपनीच्या आलिशान (व्होल्व्हो) प्रवासी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. …अधिक वाचा
सुकाणू समितीला डावलून हिंदीची सक्ती? समावेशामागे राजकारण नसल्याचे शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पहिलीपासून हिंदी भाषेव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांचेही पर्याय उपलब्ध करून देण्याची शिफारस अभ्यासक्रम आराखडा सुकाणू समितीने केली होती. …सविस्तर वाचा
पुणे : कचऱ्याच्या आगीत ८ वीजवाहिन्या खाक, एक लाख ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत
आळंदी-कळस रस्त्यावरील ‘ग्रेफ सेंटर’समोर असलेल्या ओढ्यात फेकलेल्या कचऱ्याला आग लागली. या आगीत ‘महावितरण’च्या आठ वीजवाहिन्या जळाल्या. …अधिक वाचा
औषध उत्पादक, वितरकांना दणका; अन्न व औषध प्रशासनाकडून परवाने निलंबनासह रद्द करण्याची कारवाई
गेल्या आर्थिक वर्षात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३४ औषध उत्पादक कंपन्यांचा परवाना निलंबित करण्यासह एका कंपनीचा परवाना रद्द करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली. …वाचा सविस्तर
चापेकर बंधूंचा इतिहास क्रांतितीर्थ स्मारकातून साकार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण
इंग्रज अधिकारी रँडचा वध करणाऱ्या क्रांतीवीर चापेकर बंधूंचा इतिहास पुन्हा उलगडणार आहे. चिंचवडगावातील चापेकर वाड्यातील क्रांतितीर्थ स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. …वाचा सविस्तर
पिंपरी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
सरत्या आर्थिक वर्षात ७ हजार २१४ आस्थापना आणि नागरिकांकडून एक काेटी ४८ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
काडतुसे चोरी प्रकरणाला वेगळे वळण, कौटुंबिक वादातून साडूने काढला काटा
पोलिसांनी केलेल्या तपासात साडूने कौटुंबिक वादातून साडूचा काटा काढण्यासाठी दुचाकीच्या डिकीत चोरलेली काडतुसे लपविल्याचे उघडकीस आले आहे. खडकी पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. …अधिक वाचा
मिलिंद देशमुख यांचा जामिनासाठी अर्ज
देशमुख यांना २५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार देशमुख यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
डाॅ. सुश्रूत घैसास यांना पोलीस संरक्षण
गर्भवती असलेल्या ईश्वरी (तनिषा) भिसे यांच्यावर वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. …सविस्तर वाचा
पूर्णत्वाला गेलेल्या प्रकल्पांची आयुक्तांकडून पाहणी होणार
महापालिकेच्या वतीने या भागात सव्वादोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरूच असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. …सविस्तर वाचा
महात्मा फुले स्मारकासाठी जागा बाधितांचे फेर सर्वेक्षण
या भागातील जागामालक, भाडेकरूंच्या घरी जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना कोणत्या प्रकारचा मोबदला अपेक्षित आहे, याची माहिती गोळा करून अहवाल तयार केला जाणार आहे. …वाचा सविस्तर
पाणीपट्टी थकबाकीच्या नावाने सायबर चोरट्यांकडून फसवणूक सुरु
पाणीपट्टी थकबाकी भरा, अन्यथा रात्री नळजोड तोडण्यात येईल, असे मेसेज आणि लिंक पाठवत नागरिकांना तातडीने थकबाकी भरण्यास सांगून फसवणूक केली जात आहे. …अधिक वाचा
भारत, उझबेकिस्तान यांचा संयुक्त सराव औंध येथे सुरू
संयुक्त प्रशिक्षणाला चालना आणि निमशहरी भागात दहशतवादविरोधी कारवायांतील सर्वोत्तम पद्धतींची देवाण-घेवाण सुलभ करण्याचा या सरावाचा उद्देश आहे. …अधिक वाचा
‘ससून’ला अहवाल फुटण्याचीच भीती अधिक! गर्भवती मृत्यू प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्याकरवी थेट मुंबईला
अहवाल सादर करताना गोपनीयतेचा भंग होऊ नये, यासाठी हा अहवाल मुंबईत वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे थेट कर्मचाऱ्याकरवी पाठविण्यात आला असून, अलंकार पोलीस ठाण्याला टपालाने पाठविण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
‘महावितरण’च्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये ‘पुणे विभाग’ सलग तिसऱ्यांदा अव्वल
महावितरणच्या राज्यभरातील २५ लघु प्रशिक्षण केंद्रांतून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. …सविस्तर वाचा
कर युद्धाचा भारतावर थेट परिणाम नाही – डॉ.जयदेव रानडे यांचे मत
‘सेंटर फॉर चायना ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजी’, ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामरिक शास्त्र विभागातर्फे आयोजित ‘राईज ऑफ चायना अँड इट्स इंप्लिकेशन फॉर द वर्ल्ड’ या परिषदेत डॉ. रानडे बोलत होते. …सविस्तर वाचा
डांबर खरेदीतील ठेकेदारी संपुष्टात, आता कंपन्यांकडूनच थेट खरेदी करण्याची आयुक्तांची माहिती
डांबर उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याऐवजी महापालिका ठेकेदारामार्फत डांबराची खरेदी करीत होती. त्यामुळे महापालिकेचे प्रतिटन चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान होत होते. …वाचा सविस्तर
धरणांतील पाणीसाठ्यात घट, काटकसर करण्याचे ‘जलसंपदा’चे महापालिकेला आवाहन
शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या चारही धरणांत मिळून १०.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा १०.०९ टीएमसी होता. …वाचा सविस्तर
खासगी टँकरचे दर वाढणार? पुणे महापालिकेकडून टँकरना पाणी वितरण दरात पाच टक्के वाढ
महापालिकेने टँकरच्या दरात वाढ केल्याने टँकरचालकांंकडूनही दरांत वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. …सविस्तर बातमी
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील नऊ उड्डाणपुलांंचा आराखडा प्रलंबित, ‘एमएसआरडीसी’चा प्रस्ताव सात वर्षे केंद्राकडे पडून
या प्रस्तावाला केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने या महामार्गावरील कोंडी कायम आहे. …अधिक वाचा
कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या विजेवर महापालिका ‘प्रकाश’मान!, पिंपरी-चिंचवडमधील मोशीत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात १३ काेटी युनिट वीजनिर्मिती
यामुळे महापालिकेच्या वीज देयकात ३० टक्के बचत हाेत असल्याचा दावा प्रशासनाचा आहे. हा प्रकल्प चालविण्यासाठी दोन मेगावॅट वीज लागत आहे. …वाचा सविस्तर
राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात शैक्षणिक मुद्दे नाहीत, तोवर शिक्षण मागे – डॉ. अनिरुद्ध देशपांडे
बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अनिरुद्ध देशपांडे उद्या, १८ एप्रिल रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत.
…अधिक वाचा
शाळांचे वार्षिक वेळापत्रकही नवे?
राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता पहिलीपासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
…सविस्तर बातमी
गर्भवतीच्या मूत्यूप्रकरणी रुग्णालयावर कारवाई कधी होणार? आमदार गोरखे म्हणाले…
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून उपचारात हलगर्जीपणा झाल्याने गर्भवतीचा मृत्यू झालेल्या प्रकरणाचा चौथा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा शासनाला सादर झाला आहे.
…सविस्तर वाचा
पिंपरी- चिंचवडच्या अभियंता महिलेने बनविला जगातील पहिला अत्याधुनिक पाळणा?;एआय तंत्रज्ञानाचा वापर!
क्रेडलवाइज हे जगातील पहिले एआय स्वयंचलित स्मार्ट क्रीब तंत्रज्ञान आता भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे अशी माहिती कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक किरण ब्याहटटी यांनी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
…अधिक वाचा
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स