Latest News in Pune Today : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात दाखल केले. गुन्हा घडल्यानंतर ५२ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये ८२ साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदविण्यात आले आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या १२३ नव्या सीएनजी बस सदोष असल्याने त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे. सर्व बस संबंधित कंपनीकडे माघारी पाठविण्यात आल्या असून, बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गांवर सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल…
Pune Maharashtra News LIVE Today, 18 April 2025
राज्य मागासवर्ग आयोगात भ्रष्टाचार? सुषमा अंधारे यांचा आरोप
रोबोटिक प्रक्रियेने ब्रेन ट्यूमरवर उपचार! पुण्यातील डॉक्टरांचे यश; अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी
बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून तरुणाचा फरशी डोक्यात घालून खून, पुणे चंदननगरमधील घटना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रँडचा वध केला एवढेच चापेकर बंधू यांचे कार्य नाही….
स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल
पुणे : रिंग रोडसाठी तातडीने भूसंपादनाच्या सूचना
पुणे महापालिकेतील घोटाळ्यांची झाडाझडती, बैठक घेण्याची चंद्रकांत पाटील यांची माहिती
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स