Latest News in Pune Today : पुणे परिसरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती तसेच वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या, राजकीय घडामोडी आणि महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत…

Live Updates

Pune Maharashtra News LIVE Today 19 March 2025

16:22 (IST) 19 Mar 2025

पुरंदर विमानतळ भूसंपादनाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा; निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा पाठिंबा

पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दोन हजार ८३२ हेक्टर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केल्यानंतर स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी बाधित होणाऱ्या सातही गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

वाचा सविस्तर...

14:33 (IST) 19 Mar 2025

रेल्वे स्थानकावर ग्राहकांची लूट, सल्लागार समितीतील सदस्याकडून चित्रफीत प्रसारित

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेते ग्राहकांकडून जादा दर आकारत असल्याचे चित्रीकरण विभागीय रेल्वे सल्लागार समितीतील (झेडआरयूसीसी) एका सदस्यानेच गोपनीय पद्धतीने केले.

वाचा सविस्तर...

14:32 (IST) 19 Mar 2025

एचएसआरपी कंपनीचा नवीन प्रताप, पाटी बसविण्यासाठी मुदतीनंतरच्या तारखा

पुणे : ‘जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) मुदतीत लावण्यासाठी तातडीने केंद्रांची संख्या वाढवावी,’ असे आदेश उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) रोजमेर्टा कंपनीला दिले आहेत.

वाचा सविस्तर...

14:27 (IST) 19 Mar 2025

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा लवकरच नव्या रूपातराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा लवकरच नव्या रूपात

पुणे : केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी स्थगित केलेली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) ही शिष्यवृत्ती योजना आता नव्या स्वरूपात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय त्याबाबत नियोजन करत असून, नव्या स्वरूपात योजना अधिक व्यापक केली जाईल.

वाचा सविस्तर...

13:15 (IST) 19 Mar 2025

चित्रपटसृष्टीने ‘क्रॅश कोर्स’ करावा, ज्येष्ठ अभिनेते पीयूष मिश्रा यांचे खडे बोल

पुणे : ‘पैसे मिळत नाहीत, असे नाटकवाले नेहमीच म्हणतात. पण, नाटक नेहमी पैशांशिवायच चांगले होत राहील. पैसे मिळाले तर चांगले नाटक होणार नाही. पैसे नसतानाही चांगले नाटक करता येते, हे विद्यार्थ्यांनी सिद्ध केले,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते, कवी, गायक पीयूष मिश्रा यांनी मंगळवारी फिरोदिया करंडक स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक केले.

वाचा सविस्तर...

13:10 (IST) 19 Mar 2025

पीएमपीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिली विधानपरिषदेत कबुली!

पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी शहरातील विविध भागांत पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या वतीने (पीएमपीएमएल) उभारण्यात आलेल्या ३५ बसशेडची दुरवस्था झाल्याची कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.

वाचा सविस्तर...

11:24 (IST) 19 Mar 2025

अल्पवयीनावर शस्त्राने वार, अकरा जणांविरुद्ध गुन्हा; खडकी बाजारातील घटना

पुणे : वादातून एका अल्पवयीनावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. लक्ष्य कैलास गोयर (वय १७, रा. खडकी बाजार) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

वाचा सविस्तर...

11:19 (IST) 19 Mar 2025

उपाहारगृहचालकाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : भाडेतत्वावर घेतलेले उपहारगृह सोडण्यास सांगितल्याने एका उपाहारगृहचालकाने आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. उपाहारगृहचालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर...

10:13 (IST) 19 Mar 2025

हिंजवडीत धावत्या बसला आग; चार जणांचा होरपळून मृत्यू, सहा जणांची प्रकृती चिंताजनक

पिंपरी- चिंचवड मध्ये बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. होमा प्रिंटिंग प्रेस ची बस तमन्ना सर्कल वरून रेजवान च्या दिशेने जात होती.

सविस्तर वाचा

09:55 (IST) 19 Mar 2025

पिंपरी : वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना डॉक्टर ‘एसीबी’च्या जाळ्यात

पिंपरी : वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

वाचा सविस्तर...

09:54 (IST) 19 Mar 2025

पुण्यात सर्वाधिक भाडे कोणत्या भागात…भाड्यात सर्वांत जास्त वाढ कुठे? सविस्तर जाणून घ्या…

पुणे : देशभरात गेल्या काही वर्षांत घरांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. घरांच्या किमती वाढत असताना त्यांच्या भाड्यातही वाढ होताना दिसत आहे. पुण्यात गेल्या ३ वर्षांत घरांच्या किमतीत ३७ टक्के वाढ झाली असून, घरभाड्यात ५७ ते ६५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे पुण्यात घरांच्या किमतीपेक्षा घरभाड्यातील वाढीचा वेग जास्त असल्याचे समोर आले आहे.

वाचा सविस्तर...

pune municipal corporation

पुणे महानगरपालिका

Story img Loader