Latest News in Pune Today : कात्रज भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अघोषित पाणीकपात सुरू केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यावर, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याचे स्पष्टीकरण पाणीपुरवठा विभागाने दिले आहे. राज्य शासनाकडून वार्षिक बाजारमूल्य दरात (रेडीरेकनर) वाढ करण्यात आल्यानंतर पुणे शहरातील विधी महाविद्यालय रस्ता परिसर सर्वाधिक महागडा ठरला आहे. गेल्या तीन वर्षांपर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कोरेगाव पार्क परिसराला त्याने मागे टाकले आहे. तेव्हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मावळ आणि जिल्ह्यातील विविध बातम्या या live blog च्या माध्यमातून घेता येतील…
Pune Maharashtra News Today, 2 April 2025
पुणे : बनावट कंपनी स्थापन करुन १०४ कामगारांचे ‘पीएफ’ खाते
पुणे : कंपनी अस्तित्वात नसताना १०४ कामगारांच्या नावे बनावट भविष्य निर्वाह खाते (प्रोव्हिडंट फंड) उघडून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. बनावट खाते उघडल्याचा प्रकार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला माहिती नव्हती. काही कामगारांना खाते बंद करुन पैसे काढण्यासाठी धमकाविण्यात आल्याचा संदेश समाज माध्यमातून पाठविण्यात आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
‘मी एस. एम.’मधून उलगडला समाजवादी नेत्याचा प्रवास
पुणे : समाजवादी विचारांशी एकनिष्ठ राहूनही राजकीय आणि सामाजिक विषयांवरील स्पष्टपणाने व्यक्त केलेली मते, राजकीय क्षेत्रात व्यग्र राहूनही क्रिकेट, चित्रपट आणि अभिजात गायन श्रवण हे छंद जोपासणारे ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी या समाजवादी नेत्याचा प्रवास त्यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘मी एस. एम.’ या लघुपटातून मंगळवारी उलगडला.
पुणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ, आतापर्यंतचे सर्वाधिक; गेल्या वर्षीपेक्षा १२ कोटींनी अधिक
पुणे : पुणे महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८ हजार २७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२ कोटी रुपयांनी उत्पन्न वाढले असून, आतापर्यंतच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये मिळालेले हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.
प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने नियोजित पतीच्या खुनाची सुपारी
पुणे : प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने तरुणीने प्रियकराशी संगनमत करुन नियोजित पतीला जिवे मारण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी यवत पोलिसांनी प्रियकरासह साथीदारांना गजाआड केले असून, नियोजित पतीचा खुनाचा प्रयत्न करणारी तरुणी पसार झाली आहे.
पुणे : एकीकडे तापत्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत असल्याने वीज वितरण यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच शहरी आणि ग्रामीण भागात असलेल्या महापारेषण आणि महावितरणच्या वीजयंत्रणेजवळ किंवा वीजतारांखाली ऊस, गवत तसेच कचरा पेटवण्याचे प्रकार घडत आहेत.
सेमीकंडक्टर उद्योगात पुण्याचे स्थान महत्त्वाचे; अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या वतीने आयोजित परिसंवादातील सूर
पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिकेतील तंत्रज्ञान भागीदारीवर भर दिला आहे. आधुनिक संशोधनाचा सेमीकंडक्टर उद्योग हा कणा असून, पुणे हे संशोधन आणि शिक्षणाचे केंद्र असल्याने ते द्विपक्षीय सेमीकंडक्टर भागीदारीत महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असा सूर अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या वतीने आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
कोकणातील जांभळे पुण्यातील बाजारात
पुणे : कोकणातील सावंतवाडी भागातून जांभळांची आवक सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो जांभळांना ३५० ते ४०० रुपये दर मिळाले आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत गुजरातमधील जांभळांचा हंगाम सुरू होणार आहे. गुजरातमधील जांभळे बाजारात दाखल झाल्यानंतर दरात आणखी घट होईल.
विविध करांतून २,१०९ कोटी, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा
पिंपरी : सरत्या आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळकतकर, बांधकाम परवानगी, अग्निशामक, पाणीपुरवठा, आकाशचिन्ह व परवाना, भूमी जिंदगी, प्राधिकरण भूखंड हस्तांतर, स्थानिक संस्था कर या विभागातून दोन हजार १०९ कोटी २३ लाखांचा महसूल मिळाला आहे.
यंदाचा मार्च सर्वांत तापदायक, गेल्या दहा वर्षांतील शहरातील सर्वाधिक सरासरी तापमानाची नोंद
पुणे : यंदा मार्चमध्ये शहरातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याचे स्पष्ट झाले असून, गेल्या दशकभरातील सर्वाधिक सरासरी तापमानाची नोंद झाली आहे. यंदा मार्चमध्येच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या. शहरातील काही भागांमध्ये तापमानाने चाळीशीही ओलांडली.
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स
