Pune Breaking News Updates : पुणे परिसरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या, राजकीय घडामोडी तसंच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही इथे मिळेल…
Pune Maharashtra News Live Today 20 march 2025
एक लाखाची लाच घेताना बारामतीमध्ये नगर रचनाकाराला सापळा रचून अटक
बारामती तालुका नगर परिषदमध्ये विकास ढेकळे हे नगर रचनाकार (टॉऊन प्लॉनर) आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
पुणे : वास्तुकला अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींची कल्पकता… सिंहगड रस्ता परिसरात दिसतोय बदल…
शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनातील कागद, काच आणि प्लॅस्टिक वेगळे करून पिंजऱ्यात वर्गवारीनुसार ठेवले जाते.
भरत नाट्य मंदिराचा पुनर्विकास आवश्यक, कृष्णकुमार गोयल यांचे मत
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित संगीत नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनावेळी गोयल बोलत होते.
पुणे : संशोधनाला निधी देण्यात विद्यापीठाचा हात आखडता
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा २२ मार्च रोजी होणार आहे. त्यासाठीची कार्यक्रमपत्रिका अंतिम करण्यात आली आहे.
नवकल्पनांना मिळतेय उद्योजकतेचे बळ! राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचे उद्घाटन
केंद्रीय 'एमएसएमई' मंत्रालयाच्या सहयोगाने एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशिप फोरमच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी दफ्तरदार बोलत होते.
सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ का आली?
सरकारी बँकांचे कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत असून, या निमित्ताने त्यांचे अनेक प्रश्न समोर आले आहेत. बँकांतील अपुरी कर्मचारी संख्या, आउटसोर्सिंगसह नोकरीतील आणि कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेचे अनेक मुद्दे यामुळे उपस्थित झाले आहेत.
पुण्यातील मटका किंग नंदू नाईकविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई, वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध
पुणे : शुक्रवार पेठेत मटका अड्डा चालविणारा सराइत नंदू नाईक याच्याविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशाने त्याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
पुणे शहरात मटका, जुगार अड्डा चालविल्याप्रकरणी नंदकुमार उर्फ नंदू बाबुराव नाईक (वय ७२, शुक्रवार पेठ) याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात ३६ गुन्हे दाखल आहेत. अनेक तरुणांना जुगार खेळण्याचा नाद नाईक याने लावला होता. जुगाराच्या नादामुळे अनेक जण कर्जबाजारी झाले होते. नाईक याच्या अड्डयावर पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली होती. मात्र, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. त्याने छत्रपती शिवाजी रस्त्यावरील एका इमारतीत जुगार अड्डा सुरू केला होता. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी यापूर्वी छापे टाकले होते. त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तयार केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली. त्याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण,गु्न्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, सहायक निरीक्षक हर्षल कदम, संतोष थोरात, चंद्रशेखर खरात, इरफान नदाफ यांनी ही कारवाई केली.
पुणे : सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे ४१ लाखांची फसवणूक टळली
सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे एका खासगी कंपनीची ४१ लाख रुपयांची फसवणूक टळली.
भर चौकात लघुशंका प्रकरणी भाग्येश ओसवालला जामीन, गौरव आहुजाचा मुक्काम येरवडा कारागृहात
पुणे : भर चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाचा मित्र भाग्येश ओसवाल याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी बुधवारी जामीन मंजूर केला. गौरव आहुजाच्या जामीन अर्जावर म्हणणे (से) मांडण्यास पोलिसांनी तीन दिवसांची मुदत मागितली आहे. न्यायालयाने गौरवला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात लघुशंका केल्याप्रकरणी गौरव आहुजा (वय २५, रा. साठे काॅलनी, शुक्रवार पेठ) आणि भाग्येश ओसवाल (वय २५, रा. मार्केट यार्ड) यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. भाग्येशने याप्रकरणात जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणात भाग्येश मोटारीत बसला होता. त्याचा या गुन्ह्यात थेट संबंध नाही. तो तपासासाठी सहकार्य करेल. त्यामुळे त्याची जामीनावर मुक्तता करण्यात यावी, अशी विनंती भाग्येशचे वकील पुष्कर दुर्गे यांनी युक्तिवादात केली. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी भाग्येशला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याप्रकरणात गौरवने जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर येरवडा पोलिसांनी न्यायालयात ‘म्हणणे’ मांडण्यासाठी (से) दाखल करण्यास तीन दिवसांची मुदत मागितली आहे.
इंदापूर : उजनी काठी पक्ष्यांचे फिरते संमेलन
पाचशेहून अधिक संख्येतील फ्लेमिंगो पळसदेव येथे उजनी धरण पाणलोट परिसरात येऊन दाखल झाल्यामुळे पक्षीप्रेमी व पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे.
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां…सहकाऱ्यांचा टाहो आणि किंकाळ्या! दुर्घटनेत बचावलेले विठ्ठल दिघे यांना मानसिक धक्का
या दुर्घटनेतून मी वाचलो. मात्र, माझे जिवाभावाचे सहकारी गमावले. या धक्क्यातून मी लवकर बाहेर येईल, असे वाटत नाही.
