Latest News in Pune Today : डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून (२१ एप्रिल) बंद करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त दीड महिने भिडे पूल परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. काँग्रेसचे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी (२२ एप्रिल) थोपटे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मावळ तसंच पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Pune Maharashtra News, 21 April 2025

20:28 (IST) 21 Apr 2025

शेतकऱ्यांनी ‘चुना’ लावल्याने जुनी एक रुपयात पीक विमा योजना बंद, निकषात बदल करून नव्याने योजना; अजित पवार यांंची माहिती

‘एक रुपयातील पीक विमा योजना अडचणीत आली आहे. ग्रामीण भाषेत सांगायचे, तर शेतकऱ्यांनी या योजनेला ‘चुना’ लावला आहे,’ असे सांगत एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ...अधिक वाचा
20:21 (IST) 21 Apr 2025

कृषी क्षेत्रासाठी ‘एआय’ धोरणात सहा पिकांचा समावेश, अजित पवार यांची माहिती

‘कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर’ यासंदर्भात साखर संकुल येथे अजित पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. ...सविस्तर बातमी
18:35 (IST) 21 Apr 2025

‘पिंक ई- रिक्षा’ला लवकरच पूरक सेवेचा दर्जा - अजित पवार यांची ग्वाही

महिला व बाल विकास विभागाच्यावतीने जिल्ह्यातील चार हजार महिलांना पिंक ई- रिक्षाचे वितरण कृषी महाविद्यालय येथे करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते. ...अधिक वाचा
18:13 (IST) 21 Apr 2025

एमपीएससीचा मोठा निर्णय… दिव्यांगत्त्वाचा तपशील विधिग्राह्य नसल्यास पदभरतीमध्ये अर्ज करण्यास मनाई!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दिव्यांग उमेदवारांचा दिव्यांगत्त्वाचा तपशील केंद्र सरकारच्या स्वावलंबन संकेतस्थळावरून विधिग्राह्य (व्हॅलिडेट) करणे आवश्यक केले आहे. ...अधिक वाचा
17:03 (IST) 21 Apr 2025

सोसायटीच्या अध्यक्षांकडून लाच घेणारे तीन पोलीस कर्मचारी निलंबित

रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाषाण भागातील एका सोसायटीच्या अध्यक्षाकडून तीन हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. ...अधिक वाचा
15:56 (IST) 21 Apr 2025

बीड तरुणीची आत्महत्या प्रकरण : आरोपीला कडक शासन करण्याच्या सूचना

बीड जिल्ह्यातील एका तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 14 मार्चला घडली.त्या घटनेला जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. ...वाचा सविस्तर
15:41 (IST) 21 Apr 2025

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत पुण्यातील तिघांचा मृत्यू - अपघातात १४ जण जखमी

मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा परिसरात रविवारी रात्री भरधाव ट्रकने मोटारीला धडक दिली. त्यानंतर मोटार पुण्याकडे येणाऱ्या मोटारीवर आदळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. ...अधिक वाचा
15:40 (IST) 21 Apr 2025

पिंपरी : बचत गटांमार्फत मालमत्ता करांच्या बिलांचे वाटप, 'या' तारखेपर्यंत कर भरल्यास दहा टक्के सवलत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ताकरांची देयके वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. बचत गटातील महिलांच्या माध्यमातून घरोघरी देयकांचे वितरण केले जात आहे. ...सविस्तर बातमी
14:05 (IST) 21 Apr 2025

‘पीएमपी’त आता वाहकही कंत्राटी, दोन हजार चालक आणि वाहक कंत्राटी पद्धतीने भरण्यास सहमती

कंत्राटी पद्धतीने (भाडेतत्त्वावर) ४०० बस सेवेत दाखल करण्यात येणार असताना एक हजार चालकांबरोबर एक हजार वाहकांचीही सेवा घेतली जाणार आहे. ...अधिक वाचा
13:19 (IST) 21 Apr 2025

साहित्य समीक्षा गटातटामध्ये विभागलेली - प्रा. मिलिंद जोशी यांचे मत

‘अक्षर वाङ्मय’च्या वतीने ‘सुधीर रसाळ विशेषांका’चे प्रकाशन राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी प्रा. मिलिंद जोशी बोलत होते. ...अधिक वाचा
13:05 (IST) 21 Apr 2025

शिवनेरीवर मधमाश्यांच्या हल्ल्यात पाच बालकांसह १६ पर्यटक जखमी

बहुतांश जखमी जालना, पुणे, श्रीवर्धन येथील होते. मधमाश्यांनी हल्ला केल्याची गेल्या दोन महिन्यांतील ही चौथी घटना होती. ...सविस्तर बातमी
12:51 (IST) 21 Apr 2025

देशातील वैद्यकीय व्यवस्थेत बदलाची गरज, डॉ. अनंत फडके यांचे मत

‘देशातील वैद्यकीय व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. त्यात वैद्यकीय शिक्षण, औषधनिर्मिती क्षेत्र, प्रयोगशाळा, रुग्णालये या सर्वच स्तरांवर बदल आवश्यक आहेत.असे मत ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. अनंत फडके यांनी मांडले. ...सविस्तर वाचा
12:30 (IST) 21 Apr 2025

रोहन सुरवसे यांचा राजीनामा

पुणे : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळेच हा निर्णय घेतल्याचे सुरवसे यांनी सांगितले.‘सरचिटणीस म्हणून काम करताना विचारधारेला प्रमाण मानून काम केले. गटातटाच्या राजकारणात पडलो नाही. पक्षकार्यातही सक्रिय राहिलो. काँग्रेस सर्वसामान्यांना आपला पक्ष वाटतो. मात्र, संघटनेतील अनेक बाबी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटल्या नाहीत. पक्ष अडचणीतून जात आहे. या परिस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतो, याचा विचार पक्षाच्या नेत्यांनी करणे आवश्यक आहे,’ असे सुरवसे-पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद करण्यात आले आहे.

12:00 (IST) 21 Apr 2025

भिडे पूल परिसरातील वाहतूक आजपासून पर्यायी मार्गाने, मेट्रो पुलाच्या कामानिमित्त वाहतूक बदल

डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून (२१ एप्रिल) बंद करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त दीड महिने भिडे पूल परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

11:57 (IST) 21 Apr 2025

कर्जबाजारी झाल्याने सराफाचा दरोड्याचा बनाव, धायरीतील सराफी पेढीवर दरोडा प्रकरणाला वेगळे वळण

सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका सराफी पेढीवर खेळण्यातील पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकून दागिने लूट प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. याप्रकरणात गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली होती.

सविस्तर बातमी...

11:56 (IST) 21 Apr 2025

माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपप्रवेश निश्चित, सतत डावलल्याने निर्णय

काँग्रेसचे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी (२२ एप्रिल) थोपटे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

सविस्तर वाचा...

Pune News Live Today in Marathi

पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स ( Express File image )