Latest News in Pune Today Live : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आता ‘पिंक ई रिक्षा’ सेवेची भर पडली असून, पहिल्या टप्प्यात चार हजार गुलाबी रिक्षा शहरातील रस्त्यांंवर धावणार आहेत. आतापर्यंत ३,२३० महिलांनी अर्ज केले असून, १७२६ रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे. ‘राज्यात धरणे बांधण्याजोग्या जागा जवळपास संपल्या असून, लोकसंख्यावाढीमुळे महानगरांना पिण्यासाठी अधिकाधिक पाणी द्यावे लागत आहे. आता मुळशीसारख्या अन्य जलविद्युत प्रकल्पांतून वीजनिर्मिती करण्याऐवजी सौरऊर्जा प्रकल्प, सहवीज प्रकल्प, आण्विक वीजनिर्मिती प्रकल्प आदी पर्याय उपलब्ध आहेत. जलविद्युत प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी दिल्यानंतर अन्य प्रकल्पांचे पाणी शेतीसाठी देता येईल,’ अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे मांडली.
Pune Maharashtra News LIVE Today, 22 April 2025
एम्प्रेस गार्डनमध्ये ‘उर्वशी’ वृक्षाचे रोपण
पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून मंगळवारी दुर्मीळ अशा ‘उर्वशी’ वृक्षाचे रोप लावण्यात आले. एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनातर्फे आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या उपाध्यक्षा सुमनताई किर्लोस्कर यांच्या हस्ते हे रोप लावण्यात आले. ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डाॅ. श्री. द. महाजन, श्रीकांत इगळहळीकर, शर्वरी बर्वे, प्रशांत चव्हाण यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मानद सचिव सुरेश पिंगळे, यशवंत खैरे या वेळी उपस्थित होते. शिवण, पिवळा कांचन, सोनचाफा, तामन, शेंदरी या वृक्षांची रोपे लावण्यात आली.
उर्वशी वृक्ष मूळचा म्यानमार (ब्रह्मदेश) येथील असून, जगातील हाताच्या बोटांवर मोजता येतील, अशा अतिसुंदर वृक्षांमध्ये गणला जातो. ‘अम्हर्स्टिया नोबिलिस’ हे शास्त्रीय नाव असलेला हा सदाहरित वृक्ष आहे आणि विलक्षण सौंदर्यामुळे ‘उर्वशी वृक्ष’ म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.
हवामान बदलांना तोंड देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करा : राज्यपाल
पुणे : द. मा. मिरासदार प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते आणि कवी संकर्षण कऱ्हाडे यांना यंदाचा द. मा. मिरासदार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या राजवाडे सभागृहामध्ये रविवारी (२७ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते संकर्षण कऱ्हाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या जन्मदिनानिमित्त गेल्या दोन वर्षांपासून द. मा. मिरासदार प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिला जातो, अशी माहिती द. मा. मिरासदार प्रतिष्ठानचे रवींद्र मंकणी आणि हरीभाऊ मिरासदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार
समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
पुणे : गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’कारवाई
लाखो वीजग्राहकांना पेटत्या कचऱ्याचा फटका, वीजयंत्रणेजवळ कचरा न टाकण्याचे ‘महावितरण’चे आवाहन
‘उजनी’चा साखरपट्टा आता केळीचे आगर, साखर कारखान्यांना धोक्याची घंटा
खडकाळ माळरानावरील अंजीराच्या बागेतून ‘लक्ष्मी’चे दर्शन ! बारामतीतील शेतकऱ्यांची यशोगाथा
भाजपमध्ये मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीत घराणेशाही; आमदारपुत्र, समर्थकांना स्थान
महापुरुषांविषयी विनाकारण द्वैत निर्माण करण्याची वृत्ती घातक, डाॅ. राजा दीक्षित यांचे मत
शहरबात : सायबर गुन्ह्यांचे जग
पक्ष्यांच्या ८१ प्रजातींचा ‘फर्ग्युसन’मध्ये अधिवास! स्थानिक पक्ष्यांसह युरोपातून स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांचाही आवारात वावर
कृषी क्षेत्रासाठी ‘एआय’ धोरणात सहा पिकांचा समावेश, अजित पवार यांची माहिती
‘मुळशी’चे पाणी पिण्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका
पुणे : शहरातील रस्त्यांवर आता गुलाबी रिक्षांची ‘धाव’, १७७६ ‘पिंक ई-रिक्षां’ना परवानगी
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स