Latest News in Pune Today Live : भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

Live Updates

Pune Maharashtra News LIVE Today : पुण्याचे अपडेट्स एका क्लिकवर

20:17 (IST) 24 Feb 2025

‘रस्त्यावर चालणारा प्रत्येक जण गुन्हेगार नाही’, नागरिकांशी सौजन्याने वागा

पुणे : ‘रस्यावर चालणारा प्रत्येक जण गु्न्हेगार नाही. वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करावी. मात्र, कारवाई करताना वादाचे प्रसंग टाळावेत. नागरिकांशी सौजन्याने वाागावे’, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिले.

वाचा सविस्तर...

19:32 (IST) 24 Feb 2025

चित्रपटांतून समाजभान निर्माण होण्याची गरज, लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे मत

पुणे : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाहीत. चित्रपटांतून समाजभान निर्माण व्हायला हवे, असे मत लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मांडले.

वाचा सविस्तर...

19:05 (IST) 24 Feb 2025

तृतीयपंथीयांच्या लढ्याला न्याय नाही; श्रीगौरी सावंत यांची खंत

पुणे : ‘आम्ही भारतीय आहोत. संविधानाने आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. तरीही आमचे हक्क मिळविण्यासाठी भांडावे लागते. आमच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वोच्च न्यायायलायात ११ वर्षांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही आम्हा तृतीयपंथीच्या लढ्याला न्याय मिळत नाही,’ अशी खंत तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि सखी चारचौघी या संस्थेच्या संचालक श्रीगौरी सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

वाचा सविस्तर...

18:50 (IST) 24 Feb 2025

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेता येणार घरबसल्या!

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता हस्तांतरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यासह विविध सेवांचा लाभ आता शहरातील नागरिकांना घरबसल्या घेता येणार आहे.

वाचा सविस्तर...

18:37 (IST) 24 Feb 2025

संगणक अभियंत्याला मारहाण प्रकरणात गज्या मारणेसह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई

पुणे : कोथरुडमध्ये संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना गज्या मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गज्या मारणेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यन्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले.

वाचा सविस्तर...

18:18 (IST) 24 Feb 2025

कोथरूड पुन्हा हादरले; शास्त्रीनगरमध्ये तरुणाचा खून, पिस्तुलातून गाेळीबार करुन तलवार, कोयत्याने वार

पुणे : वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर तलवारीने वार करुन खून केल्याची घटना कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात रविवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

18:00 (IST) 24 Feb 2025

पुणे : स्वारगेट – कात्रज मेट्रो मार्गाला गती, राज्य सरकारकडून मंजुरीची प्रतीक्षा

पुणे : स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिका प्रकल्पामध्ये बालाजीनगर (भारती विद्यापीठाजवळ) आणि सहकारनगर (बिबवेवाडी) ही दोन स्थानके वाढविण्याबाबतचा प्रस्ताव जानेवारी महिनाअखेरीसच राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी प्राप्त होताच पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) देण्यात आली.

वाचा सविस्तर...

17:53 (IST) 24 Feb 2025

तृतीयपंथीयांच्या लढ्याला न्याय नाही; श्रीगौरी सावंत यांची खंत

‘आम्ही भारतीय आहोत. संविधानाने आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. तरीही आमचे हक्क मिळविण्यासाठी भांडावे लागते. आमच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वोच्च न्यायायलायात ११ वर्षांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

17:40 (IST) 24 Feb 2025

नेत्यांच्या कार्यशैलीला कंटाळून पदाधिकाऱ्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश

पुणे : काँग्रेसमधील काही नेते कार्यकर्त्यांना मोठे होण्याची संधी देत नाहीत, असा आरोप करत काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि काही पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

वाचा सविस्तर...

17:39 (IST) 24 Feb 2025

पुणे : प्री वेडिंग शूटिंगला फाटा देत मनशांती छात्रालयास मदत

शिरुर : मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याचा ट्रेंड वाढू लागल्याचा जमान्यात प्री वेडिंग फोटोशूटला फाटा देत शिरुर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ संचालित मनशांती छात्रालयातील विद्यार्थ्याना पहिली ते १० वी इयत्तांचा संपूर्ण अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर व ४२ इंच टीव्ही कॅरम बोर्ड, बॅडमिंटन किट, चेस बोर्ड व स्नेहभोजन देऊन योगेश पंदरकर व सीमा निभोरे यांनी नवा आदर्श घालून दिला.

वाचा सविस्तर...

17:38 (IST) 24 Feb 2025

पुणे : कौटुंबिक वादातून तरुणाला बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

पुणे : कौटुंबिक वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना वानवडीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर...

17:37 (IST) 24 Feb 2025

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता मध्यवर्ती प्राणिगृह… राज्यातील ठरणार एकमेव विद्यापीठ

पुणे : संशोधनातील प्रयोगांमध्ये वापरण्यात येणारे ससे, उंदीर अशा प्राण्यांची पैदास करण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती प्राणिगृहाची निर्मिती करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मध्यवर्ती प्राणिगृहाची सुविधा उभारणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्य विद्यापीठांमध्ये एकमेव विद्यापीठ ठरणार आहे.

वाचा सविस्तर...

17:36 (IST) 24 Feb 2025

पोलीस गाडीतून उडी मारून पळालेल्या सराइताला पाठलाग करून पकडले; अप्पा बळवंत चौकातील घटना

पुणे : पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराइताला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. गजबजलेल्या बाजीराव रस्त्यावरील अप्पा बळवंत चौकात रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

वाचा सविस्तर...

17:36 (IST) 24 Feb 2025

वारजे माळवाडीतील चार गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई; वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

वारजे माळवाडी दहशत माजविणाऱ्या चार गुंडांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…

17:36 (IST) 24 Feb 2025

जेजुरी : वाल्हे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर दौंडजजवळ अज्ञात वाहन व दुचाकी गाडी यांच्यात अपघात होवून दुचाकी गाडीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालक गाडीसह पळून गेला.

वाचा सविस्तर...

pune municipal corporation loksatta news

पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत

Story img Loader