Latest News in Pune Today Live : भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
Pune Maharashtra News LIVE Today : पुण्याचे अपडेट्स एका क्लिकवर
तीन वेगवेगळ्या नावाने भोसरीत वास्तव्य करणारा बांगलादेशी अटकेत
पिंपरी : तीन वेगवेगळ्या नावाने बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी व्यक्तीला भोसरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास बनाचा ओढा, भोसरी येथे करण्यात आली.
बारामती शहर पोलिसांचा मद्य विक्रेत्याला दणका, दोन आठवड्या करता दारू विक्री दुकान बंद
दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये प्राप्त अधिकारानुसार बारामती मधील नितीन वाईन हे दारू विक्रीचे दुकान दोन आठवड्या करिता बंद ठेवण्याचे आदेश पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आले आहेत.
संगणक अभियंता मारहाण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, गजा मारणेविरुद्ध तक्रार असल्यास गुन्हे शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे : कोथरुड भागात संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना गुंड गजा मारणे टोळीतील सराइतांनी बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडून करण्यात येणार असून, मारणेविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त प्रभू रामलिंग महाराज पालखी सोहळ्यास हजारो भाविकांच्या उपस्थितीत व ‘ओम नम: शिवाय ‘ च्या जयघोषात सुरुवात
शिरुर : ‘हर हर महादेव ‘, ‘ प्रभू रामलिंग महाराज कि जय ‘ , ‘ ओम नम : शिवायच्या जयघोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिरुर पंचक्रोशीचे आराध्य दैवत असणा- या प्रभू रामलिंगाच्या पालखी सोहळ्याने प्रस्थान केले .
पिंपरी : महापालिका प्रशासकांनी सादर केलेल्या आगामी (२०२५-२६) या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात चिंचवड विधानसभा मतदारसंघाला झुकते माप देण्यात आले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या खात्यात १७ कोटी जमा !
पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना दर वर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आतापर्यंत ९ हजार ७९४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात १७ कोटी ४ लाख ३० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
शहरात ‘नाकाबंदी’; ३७१ वाहने जप्त – बेशिस्तांकडून १३ लाख ६५ हजारांचा दंड वसूल
पुणे पोलिसांनी सोमवारी अचानक नाकाबंदी करुन कारवाई केली. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून १३ लाख ६५ हजार रुपयांचा दंड जप्त करण्यात आला. नाकाबंदीत सव्वा चार हजार वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ३७१ वाहने जप्त करण्यात आली.
थकित मिळकतधारकांवर बारामती नगरपरिषदेची धडक मोहीम
पुणे : वसुली पथके व जप्ती पथकाव्दारे थकित मालमत्ता धारकावर धडक कारवाई करून मालमत्ता सील, जप्ती करणे, जप्त केलेला माल अटकाव करणे इत्यादी नियमोचित करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. अशी महिती बारामती नगर परिषदेचे मुखाधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
पुण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास आराखडा हवा! नीती आयोगाचे प्रमुख असं का म्हणाले…
पुणे : ‘पुणे महानगराचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यात केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर सर्वच गोष्टींचा समावेश असावा. यासाठी महाराष्ट्र सरकारने पावले उचलावीत आणि त्यात ‘एमसीसीआयए’सारख्या संस्थांनी योगदान द्यावे,’ असे प्रतिपादन नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी सोमवारी केले.
पुणे – कर्नाटक बस सेवा बंदच! सीमावर्ती भागातील नागरिकांना फटका
पुणे : पुण्यातून कर्नाटकला जाणारी आणि कर्नाटकातून पुण्याला येणारी ‘एसटी’ महामंडळाची बस सेवा गेल्या पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. पुणे स्वारगेट स्थानकातून सोडल्या जाणाऱ्या दैनंदीन बस कोल्हापूर येथपर्यंतच जात असून तेथून माघारी फिरवल्या जात आहेत. त्यामुळे याचा फटका सीमावर्ती भागातील जनसामांन्यांना बसत असून विविध मार्गांनी प्रवास करावा लागत आहे.
पुणे : ‘जीबीएस’ रुग्णांच्या वाढत्या संख्येनंतर महापालिकेला जाग, घेतला मोठा निर्णय!
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्यांच्या टाक्यांभोवती सीमाभिंत, सुरक्षारक्षकांसाठी केबिन तसेच आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
पुणे : महापालिका शिक्षकांवर होणार जबाबदारी निश्चित, काय आहे कारण ?
पुणे : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटत असल्याने यामध्ये सुधारणा करण्याासाठी शिक्षकांवर जबाबदारी निश्चित करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यावर काही हजार रुपयांचा निधी महापालिका खर्च करत असताना गुणवत्ता ढासळत असल्याचे समोर आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पुणे : ‘अभय’ योजना आणू नका, कोणी केला विरोध ?
पुणे : महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्यांसाठी अभय योजना आणण्याचा विचार महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, याला शहरातील स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी विरोध केला आहे.
पुण्यातून हवालामार्फत दुबईला परदेशी चलन, चार लाख १०० अमेरिकन डॉलर जप्त; कस्टमकडून महिलेसह दोघांना अटक
पुणे : हवालामार्फत दुबईला परदेशी चलन घेऊन निघालेल्या महिलेसह दोघांना केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या पथकाने (कस्टम) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. त्यांच्याकडून चार लाख १०० अमेरिकन डाॅलर जप्त करण्यात आले आहेत.
सावधान! एचएसआरपीचे बनावट संकेतस्थळ, खात्यातून पैसे वजा, सायबर पोलिसांकडे तक्रार
पुणे : जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी (एचएसआरपी) लावण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून पैसे लुटले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) तक्रारी होत आहेत. सायबर पोलीस ठाण्यातही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे : महाशिवरात्रीनिमित्त ‘पीएमपी’च्या विशेष बस, महत्वाच्या स्थानकावरून सुविधा
पुणे : महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी बुधवारी (२६ फेब्रुवारी) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) महत्त्वाच्या बसस्थानकांवरून विशेष बसच सोडण्यात येणार आहे.
कोकणातील चाकरमान्यांसाठी शिमाग्यानिमित्त विशेष रेल्वे, विदर्भातही होळीनिमित्त गाड्या
पुणे : मध्ये रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागांतून चाकरमान्यांना होळी सणानिमित्त कोकण आणि विदर्भात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. दोन्ही विभागांतून प्रत्येकी चार विशेष गाड्या वेगवेगळ्या मार्गावरून धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे : रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणेत वाढ
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रवासी पिशव्यांची तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक तपासणी यंत्र (स्कॅनर मशिन) आणण्यात आले असून, रेल्वे पोलिसांकडून संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे.
जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट गरजेची
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी ३२ दवाखाने आणि आठ मोठी रुग्णालये आहेत. तर, सुमारे ७०० खासगी रुग्णालये आणि अडीच हजार लहान दवाखाने आहेत. ही रुग्णालये व दवाखान्यांतून एका दिवसात साडेतीन ते चार टन जैववैद्यकीय कचरा निर्माण होतो.
शहरबात… आत्मपरीक्षणाची सर्वांनाच संधी!
कोथरूड भागात एका संगणक अभियंता तरुणाला गुंड टोळीतील सराइतांनी मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर, ‘पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण करावे,’ अशी सूचना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. मितभाषी असलेले मोहोळ आक्रमक झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पिंपरी: महाप्रसादाचे टेबल रस्त्यावर लावल्याने दोघांवर कोयत्याने वार
पिंपरी: महाप्रसादाचे जेवणाचे टेबल रस्त्यावर लावल्याने शेजाऱ्यांनी दोघांवर कोयत्याने वार केले. तसेच एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना रविवारी सायंकाळी काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेट्रो स्थानकावरून उडी मारत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी घेत २१ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (२४ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. सुजल सुनील मनकर (२१) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव आहे.
पुणे : आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर गजा मारणे पोलीस ठाण्यात
पुणे : कोथरूड भागात संगणक अभियंत्याला बेदम मारहाण प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंड गजानन उर्फ गजा मारणे हा सोमवारी सायंकाळी कोथरूड पोलीस ठाण्यात हजर झाला.
पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत