Latest News in Pune Today Live : भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Pune Maharashtra News LIVE Today : पुण्याचे अपडेट्स एका क्लिकवर

13:48 (IST) 26 Feb 2025

२८ वर्षापासून चा प्रलंबित प्रश्न मिटला ! कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

कात्रज चौकातील गेल्या २८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ४० गुंठे जागेचे भूसंपादन करण्यास महापालिकेला यश आले आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. या जागेसाठी महापालिकेला २१ कोटी ५७ लाख ६० हजार रुपये द्यावे लागले आहेत.

सविस्तर वाचा…

13:45 (IST) 26 Feb 2025

स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार

पुणे : परगावी निघालेल्या तरुणीला धमकवून शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उगडकीस आली आहे बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

वाचा सविस्तर…

13:37 (IST) 26 Feb 2025

रांजणगावासाठी घोड धरणातून पाणी; नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याचा अजित पवार यांंचा आदेश

शिरूर तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व आणि ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्याने या क्षेत्रात स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. सविस्तर वाचा…

13:09 (IST) 26 Feb 2025

जोरदार तयारी पण इच्छुकांच्या पदरी निराशाच !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांवरील  होणारी सुनावणी पुढे ढकलली गेली. त्यामुळे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:52 (IST) 26 Feb 2025

मागितले अतिरिक्त, आले अपर आयुक्त, नक्की काय झाले ?

पुणे महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळत नसताना महसूल विभागाने पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर उपायुक्तपदावर आलेल्या महेश पाटील यांना पदोन्नती देऊन त्यांची अपर आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सविस्तर वाचा…

12:13 (IST) 26 Feb 2025

खांबावर आदळून दुचाकीस्वारासह दोघांचा मृत्यू; आंबेगावमधील जांभुळवाडी रस्त्यावर अपघात

भरधाव दुचाकी विद्युत खांबावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागातील जांभुळवाडी रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीस्वार दत्ता कल्याण चोरमले (रा. जांभुळवाडी, आंबेगाव), सहप्रवासी श्रीकांत गुरव अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नाव आहे. सविस्तर वाचा…

11:29 (IST) 26 Feb 2025

उपायुक्तांवर कारवाईसाठी मनसेचे आंदोलन, आयुक्तांनी दिले लेखी आश्वासन !

महापालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत महापालिका प्रशासनाला जाब विचारला. महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे. सविस्तर वाचा…

10:49 (IST) 26 Feb 2025

पीएमपीतील महिला वाहकाशी अश्लील कृत्य; आगार व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा, महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पीएमपीतील महिला वाहकाशी आगार व्यवस्थापकाने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आगार व्यवस्थापकाविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा…

10:31 (IST) 26 Feb 2025

शालेय समित्यांच्या गर्दीला कात्री; एकत्रीकरणाचे नवे प्रारूप प्रस्तावित

पुणे : शालेय स्तरावरील समित्यांची भाऊगर्दी कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. प्रत्येक समितीवर मुख्याध्यापक, काही शिक्षक असल्याने अनेकदा अध्यापनावर त्याचा परिणाम होत असल्याने, विषय न वगळता समित्यांची संख्या कमी करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा….

10:30 (IST) 26 Feb 2025

पुणे : एनडीए रस्त्यावर वैमनस्यातून तरुणाचा खून

पुणे : तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात घडली. टोळक्याने वैमनस्यातून हा प्रकार केला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

सविस्तर वाचा…

10:18 (IST) 26 Feb 2025

अमेरिकेची संशोधनासाठी पुण्याला पसंती! विविध संस्थांसोबत भागीदारीचे पाऊल

अमेरिकी सरकारची ‘एम्स नॅशनल लॅबोरेटरी’ भारतातील उच्च शिक्षण संस्थांसोबत तंत्रज्ञान सहकार्य आणि संशोधन व विकास भागीदारी करणार आहे. ही भागीदारीपुण्यातून सुरू होणार असून संरक्षण तंत्रज्ञान, ऊर्जा आणि दुर्मीळ खनिजे यासारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन केले जाणार आहे, अशी माहिती अमेरिकेचे वाणिज्य दूत माईक हँके यांनी मंगळवारी दिली.

सविस्तर वाचा…

09:43 (IST) 26 Feb 2025

उद्योगनगरीला विस्ताराची आस!

पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण, तळेगाव दाभाडे, रांजणगाव या औद्योगिक पट्ट्यात झपाट्याने औद्योगिकीकरण झाले. या भागात आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे सूक्ष्म, मध्यम, लघुउद्योगांची वाढ झाली. सविस्तर वाचा…

08:20 (IST) 26 Feb 2025

आभासी चलन प्रकरणात देशभरात छापे

पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभरात ६० ठिकाणी छापे टाकले. दिल्ली, चंडीगड, बंगळुरू, पुणे, नांदेड, कोल्हापूर परिसरात सीबीआयच्या पथकाने छापे टाकून चौकशी केली. गेन बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी’त गुंतवणुकीच्या आमिषाने देशभरातील अनेकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी जम्मू-काश्मीर, पंजाब, दिल्ली, चंडीगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले. फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. त्या दृष्टीने सीबीआयने मंगळवारी देशभरात ६० ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी संगणक, लॅपटॉप, तसेच अनेक इलेक्ट्राॅनिक साहित्य जप्त केले. आभासी चलन फसवणूक प्रकरणाचा तपासासाठी तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

08:17 (IST) 26 Feb 2025

पिंपरी : मालमत्ताकर भरला, तरच मार्च महिन्याचे वेतन; ठेकेदारांनाही सक्ती

महापालिकेत कायम आणि कंत्राटी असे दहा हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेचा मालमत्ताकर २८ फेब्रुवारीपर्यंत जमा करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा…

08:17 (IST) 26 Feb 2025

पिंपरी : नागरिकांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ गर्दीने पवनाथडी जत्रेचा समारोप; इतक्या कोटींची उलाढाल

पिंपरी :  शहरी आणि ग्रामीण संस्कृतीने नटलेल्या चार दिवसीय पवनाथडी जत्रेचा सोमवारी समारोप झाला. १७ वर्षांची परंपरा अबाधित ठेवत यावर्षीही महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

08:16 (IST) 26 Feb 2025

महाशिवरात्रीनिमित्त कसबा पेठेत वाहतूक बदल; कुंभारवेस ते पवळे चौक, अगरवाल तालीम रस्ता वाहतुकीस बंद

पुणे : महाशिवरात्रनिमित्त कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त बुधवारी (२६ फेब्रुवारी) सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत पुण्येश्वर मंदिर आणि अगरवाल तालीम रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा….

पुणे लाईव्ह अपडेट्स| पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स