Latest News in Pune Today Live : भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Pune Maharashtra News LIVE Today : पुण्याचे अपडेट्स एका क्लिकवर

10:12 (IST) 27 Feb 2025

पुणे : स्वारगेट बस स्थानकातील सीसीटीव्हींबाबत अनोखी माहिती समोर

पुणे : स्वारगेट बस स्थानकात महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या बसस्थानकातील सुरक्षिततेचे सर्व उपाय कुचकामी असल्याचे आढळले आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असताना पोलीस गस्तीचा अभाव आहे, तर काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा रोख प्रवाशांऐवजी चक्क आकाशावर आहे.

सविस्तर वाचा…

10:03 (IST) 27 Feb 2025

स्वारगेट बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांना तपास अहवाल सादर करण्याचे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून (एनसीडब्ल्यू) घेण्यात आली आहे.

सविस्तर वाचा….

09:40 (IST) 27 Feb 2025

‘स्वारगेट’ बलात्कार प्रकरणातील आरोपीकडून आणखी काही गुन्हे ?पसार आरोपीच्या शोधासाठी १३ पथके रवाना

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडे याच्या मित्रांची पोलिसांकडून बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. गाडे याचे आई-वडील आणि भावाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा….

09:20 (IST) 27 Feb 2025

पुणे, पिंपरी- चिंचवडसह जिल्ह्याच्या आर्थिक विकासाच्या दिशेने पहिले पाऊल

पुणे महानगर प्रदेशाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे त्याचा सर्वांगीण आर्थिक विकास करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी होत होती. नीती आयोगाच्या प्रमुखांनी पुणे महानगर प्रदेशाचा आर्थिक विकास आराखडा करण्याची सूचना केल्याने त्या दिशेने आता पहिले पाऊल पडले आहे.

सविस्तर वाचा…

08:44 (IST) 27 Feb 2025

कोथरूडचे बीड होण्यापासून वाचवा, कोथरूडकरांकडून चौका-चौकांत फलक

पुणे : कोथरूड परिसरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर समस्त कोथरूड ग्रामस्थांकडून चौका-चौकांत फलक लावण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

08:28 (IST) 27 Feb 2025

Pune Rape Case : “शांत… सरकार झोपले आहे”, पुणे शिवशाही बलात्कार प्रकरणानंतर आव्हाडांची सरकारवर टीका; स्वारगेट बसस्थानकाबाबत उपस्थित केले ५ प्रश्न

Girl Raped in Swargate Bus Stand Pune : पुणे शहरातील स्वारगेट येथील बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा…

08:28 (IST) 27 Feb 2025

VIDEO: हसला म्हणून आठ- नऊ जणांच्या टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण; पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

पिंपरी- चिंचवड मध्ये आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने दोघांना फिल्मी स्टाईल मारहाण केली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

पुणे लाईव्ह अपडेट्स| पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स