Latest News in Pune Today : राज्याचे सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात सध्या वेगवेगळ्या समस्या जोर धरू लागल्या आहे. वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, वाढती गुन्हेगारी अशा प्रकारच्या नागरी समस्यांमुळे पुणे शहर, जिल्हा आणि परिसर दिवसेंदिवस चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे राजकीय, वाहतूक, गुन्हे, सांस्कृतिक, नागरी समस्या अशा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मावळ तसंच पुणे जिल्ह्यातील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल…

Live Updates

Pune Maharashtra News Today, 28 march 2025

18:45 (IST) 28 Mar 2025

डॉ. प्रकाश-मंदाकिनी आमटे यांना गोंदण पुरस्कार जाहीर

प्रवीण जोशी हे आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेणार आहेत, अशी माहिती ‘एआयबीडीएफ’चे संस्थापक अशोककुमार सुरतवाला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वाचा…

18:32 (IST) 28 Mar 2025

पुणे : रस्ता चुकल्याने २४ चाकी अवजड ट्रक लक्ष्मी रस्त्यावर, ट्रकचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई

रस्ता चुकल्याने ट्रक नेमका कोणत्या दिशेने न्यायचा, याची माहिती नसल्याने ट्रक चालक गोंधळून गेला होता.

सविस्तर वाचा...

16:00 (IST) 28 Mar 2025

शैक्षणिक कर्जाचा हप्ता थकल्याने बाऊन्सरकडून घरात शिरून मारहाण

पुणे : खासगी वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने घरात शिरुन बाऊन्सरने एकाला मारहाण केल्याची घटना वानवडी भागात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली.

वाचा सविस्तर…

15:37 (IST) 28 Mar 2025

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींकडे पाहून अश्लील कृत्य करणार्‍या आरोपीला अखेर अटक

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणार्‍या मुलीसमोर अश्लील कृत्य करणार्‍या २४ वर्षीय अनिल वसंत गायकवाड या आरोपीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा सविस्तर…

14:12 (IST) 28 Mar 2025

शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित; तंत्रशिक्षण विभागाचे आदेश काय?

पुणे : महाडीबीटी संकेतस्थळावर तंत्रशिक्षण विभागाच्या तीन शिष्यवृत्ती योजनांचे महाविद्यालय स्तरावर १९ हजार ३३ अर्ज प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाने सर्व संस्थांना दिले आहेत.

वाचा सविस्तर…

13:39 (IST) 28 Mar 2025

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ‘नासा’, ‘इस्रो’ भेटीची संधी…

पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, तसेच संशोधन वृत्ती विकसित होण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना अमेरिकेतील ‘नासा’, तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) या अवकाश संशोधन संस्थांची भेट घडविण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर…

13:27 (IST) 28 Mar 2025

पुण्यातील शाळेतील विद्यार्थ्यांचा विश्वविक्रमी ‘पंच’; झाले काय?

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेने कराटेमध्ये अनोखा विश्वविक्रम करत इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. तीन मिनिटांत सर्वाधिक पंच मारण्याचा हा विक्रम असून, शाळेच्या १२९६ विद्यार्थ्यांनी मिळून तीन मिनिटांत २ लाख ९० हजार ३०४ पंच मारले.

वाचा सविस्तर…

13:12 (IST) 28 Mar 2025

एकात्मिक वाहतूक आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात; उद्योगांना दिलासा कसा मिळणार?

पुणे : पुणे शहरातील एकात्मिक वाहतूक आराखडा मंजुरीच्या टप्प्यात आहे. मंजुरीनंतर लवकरच कार्यवाहीला सुरुवात होईल. पुणे बाह्यवळण मार्गालाही गती देण्यात आली असून, येत्या दोन वर्षांत हा मार्ग पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

वाचा सविस्तर…

12:52 (IST) 28 Mar 2025

साडेअकरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार

पुणे : दुकानात निघालेल्या साडेअकरा वर्षाच्या मुलीचे अपहरण दुचाकीवर अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्काराची घटना उत्तमनगर येथील एका लॉजवर घडली. याप्रकरणी अपहरण करणार्‍या दोघांसह लॉजच्या मालकासह व्यवस्थावक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाचा सविस्तर…

09:36 (IST) 28 Mar 2025

विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ठिय्या! अज्ञाताचे मुलींकडे पाहून अश्लील कृत्य, तक्रारीकडे दुर्लक्ष…

पुणे : रात्री जेवायला जात असलेल्या तीन मुलींकडे पाहून एका अज्ञात व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याची घटना मंगळवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडली. या प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करून गुरुवारी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर ठिय्या आंदोलन केले.

वाचा सविस्तर…

08:56 (IST) 28 Mar 2025

बारामतीच्या एकनाथ देशमानेनी केला गुवाहाटी ते कोचिनचा सायकल प्रवास

बारामती : काही व्यक्ती खरीच ध्येयवेडी असतात, बारामतीतील एकनाथ देशमाने या सायकलपटूने गुवाहाटी ते कोचिन पर्यंतचा प्रवास एकट्याने सायकल वरून पूर्ण केला. साधारण चार हजार आठशे पन्नास किलोमीटरचे हे अंतर दोन महिन्याच्या दरम्यान त्यांनी पूर्ण केले.

वाचा सविस्तर…

08:27 (IST) 28 Mar 2025

पुतळ्याचे नूतनीकरण अनावरण समारंभ व शेतकरी मेळाव्यासाठी अजित पवार बारामती दौऱ्यावर

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शिवतीर्थ मंगल कार्यालयाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे नूतनीकरण अनावरण समारंभ आणि शेतकरी मेळाव्याच्या आयोजन कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता. २८ मार्च ) रोजी सकाळी दहा वाजता बारामती दौऱ्यावर येत आहेत. अशी माहिती माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी दिली.

वाचा सविस्तर…

08:10 (IST) 28 Mar 2025

कल्याणीनगर पोर्शे मोटार अपघात प्रकरण: डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द व्हावा यासाठी पुणे पोलिसांकडून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पत्र

पुणे : कल्याणीनगर येथील पार्शे मोटार अपघात प्रकरणात रक्त नमुने अदलाबदलीच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हाळनोर या दोघांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा, असे पत्र पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पाठविले आहे.

वाचा सविस्तर…

08:09 (IST) 28 Mar 2025

विनोदाला रागावण्यापेक्षा अंतर्मुख होणे गरजेचे; सतीश आळेकर यांचे मत

पुणे : ‘महाराष्ट्राला विनोद आणि विडंबनाची मोठी परंपरा आहे.“गाढवाचं लग्न’ आणि ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकांतून तत्कालीन पुढारी समोर बसलेले असताना त्यांच्यावर राजकीय कोटी करण्यात येत असे. त्याच्यावर न रागवता ते नितळ हसण्याने त्याला दाद देत. विनोदाला रागवण्यापेक्षा त्यामुळे अंतर्मुख होणे जास्त महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

वाचा सविस्तर…

08:07 (IST) 28 Mar 2025

शेतातील कामासाठी आळंदीमधून पाच कामगारांचे अपहरण; दिवसभर काम आणि रात्री ठेवले जात होते डांबून

पिंपरी : शेतातील कामे करण्यासाठी पाच कामगारांचे अपहरण करून कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे शेतातील खोलीत दहा दिवस डांबून ठेवले आणि त्यांच्याकडून शेतातील कामे करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आळंदी पोलिसांनी पाचही कामगारांची सुटका केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ ते २५ मार्च या कालावधीत घडली.

वाचा सविस्तर…