Latest News in Pune Today : पुणे ते सोलापूर महामार्गावरील अपघात स्थळे आणि अपघाताची कारणे यांचा ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’च्या सहकार्याने अभ्यास करून महामार्ग पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. तर दुसरीकडे पुणे महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८ हजार २७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२ कोटी रुपयांनी उत्पन्न वाढले असून, आतापर्यंतच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये मिळालेले हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. तेव्हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मावळ तसंच पुणे जिल्ह्यातील विविध घडामोडींची माहिती या live blog मधून मिळेल.
Pune Maharashtra News Today, 3 April 2025
पुणे : बालेवाडी येथील भारती विद्यापीठ शाळेजवळ इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी एक लोखंडी शेड पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक नागरिक जखमी झाला आहे.तर काही वाहनांचे नुकसान झाले आहे.