Latest News in Pune Today : गुढी पाडव्याला शहरात आंब्याला मागणी कमी राहिली. घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने आणि आंब्याचे दर तेजीत असल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली. तर यंदा जानेवारी ते मार्च तिमाहीत पुण्यात नवीन घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत तब्बल ३० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. तेव्हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मावळ तसंच पुणे शहराच्या परिसरातील आणि जिल्ह्यातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.
Pune Maharashtra News Today, 31 march 2025
महिला जळालेल्या अवस्थेत सापडली, आत्महत्या केल्याचा संशय
पुणे : कोथरूड भागातील एका सोसायटीतील सदनिकेत ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत सापडली. ७६ वर्षीय महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
कमल संपतराव घुगे (वय ७६) असे मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचे नाव आहे. कोथरूड भागातील गुरूगणेशननगर परिसरातील एका साेसायटीत कमल घुगे राहायला आहेत. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सोसायटीतील रहिवांशांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला. घुगे यांच्या सदनिकेतून धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील सदनिकेचा दरवाजा जवानांनी उघडला. तेव्हा घुगे गंभीरिरत्या होरपळल्या होत्या. सदनिकेतील साहित्याला आग लागली नव्हती. घुगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घुगे एकट्या सदनिकेत राहायला होत्या. त्यांनी सदनिका भाडेतत्वावर घेतली होती, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली.
विद्यापीठाकडून पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य… भारतरत्न जे. आर. डी. टाटा अर्थसाहाय्य योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारतरत्न जे. आर. डी. टाटा अर्थसाहाय्य योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२१ ते २१ एप्रिल २०२५ या कालावधीत पीएच.डी.साठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून, अर्ज करण्यासाठी २१ एप्रिल ही अंतिम मुदत आहे.
पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या बंगल्यासमोर नारळ, लिंबू ठेवणार्या महिलेस पोलिसांनी केली अटक
पुणे : पुणे शहराचे माजी महापौर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय धनकवडे यांच्या पुण्यातील धनकवडी येथील बंगल्यासमोर एका महिलेने नारळ,लिंबू, काळा आभिर ठेवल्याची घटना घडली आहे.
सकाळी शाळा भरवण्यात समस्या?
पुणे : उष्णतेच्या लाटेचा परिणाम विचारात घेऊन राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात अडचणी येणार असून, विद्यार्थी वाहतुकीतील अडचणींसह नोकरदार पालकांचे वेळापत्रकही बिघडण्याची शक्यता आहे.
खासगी शाळांचे परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रच!
पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) जाहीर केलेल्या वेळापत्रकाऐवजी शहरातील अनेक खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी आपल्या आधी ठरविलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात घर घ्यायचंय? आधी जाणून घ्या घरांच्या विक्रीला घरघर का?
यंदा जानेवारी ते मार्च तिमाहीत पुण्यात नवीन घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत तब्बल ३० टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
गुढी पाडव्याला आंबा खरेदीकडे पाठ, दर तेजीत असल्याने मागणी कमी
पुणे : गुढी पाडव्याला शहरात आंब्याला मागणी कमी राहिली. घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने आणि आंब्याचे दर तेजीत असल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली.
अखेर रेल्वे प्रवाशांना सुविधा, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल घेत ‘यांनी’ केली पाहणी
पुणे : ‘लोकसत्ता’ने गुरुवारच्या अंकात (२७ मार्च) ‘रेल्वे स्थानकात फलाटांवर गैरसोय’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. पुणे रेल्वे व्यवस्थापन विभागाकडून त्याची दखल घेत रेल्वे अधिकाऱ्यांनी पुणे रेल्वे स्थानकातील फलाटांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स