Pune Breaking News Updates : राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

Live Updates

Pune Maharashtra News 

12:46 (IST) 4 Mar 2025

दत्तात्रय गाडेकडून आणखी काही गुन्हे? गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेने धमकावून अत्याचार आणि विनयभंगाचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधितांनी गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, आवाहन पोलिसांनी केले आहे.

सविस्तर वाचा…

12:45 (IST) 4 Mar 2025

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली

पुणे : शहर आणि परिसरालगतचे महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त करण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिले पाऊल टाकले आहे. पीएमआरडीएसह अन्य शासकीय यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत तीन प्रमुख मार्गावरील २०१ अतिक्रमणे हटवित आहेत. त्यामुळे २० हजार चौरस फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा झाला आहे.

सविस्तर वाचा…

12:43 (IST) 4 Mar 2025

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक

Crime News स्वारगेट या ठिकाणी बसमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातल्या शिरुर तालुक्यातील एका गावात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा…

पुणे लाईव्ह अपडेट्स| पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स