Latest News in Pune Today : राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Pune Maharashtra News 5 March 2025
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन
इंदापूर – कलिंगडाच्या पीकातून पळसदेवचा शेतकरी लखपती
इंदापूर : पळसदेव (काळेवाडी )ता. येथील येथील प्रगतिशील शेतकरी रामदास दगडू चव्हाण यांनी दोन एकर कलिंगडाच्या पीकातून अवघ्या पासष्ट दिवसात साडे पाच लाख रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
संमेलन झाले; मंथनाचे काय?
साहित्यविषयक विचारांचे आदानप्रदान आणि मंथन करण्याचे प्रभावी माध्यम अशी प्रतिष्ठा असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही आपली आगळीवेगळी ओळख पुसट करत आहे, हे दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ९८ व्या साहित्य संमेलनाने अधोरेखित केले.
पुणेकरांकडून ‘पवना’ धरणातील पाणीवापर?
पुणे : शहरासाठी पवना धरणातील पाण्याचा वापर होत नसतानाही गेल्या वर्षी ०.४० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा महापालिकेने वापरला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने कालवा सल्लागार समितीत दिली असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्याच्या पाण्याच्या हिशेबात पवनाचे पाणी दाखविल्याने शहराचा पाणीवापरही वाढल्याचे दिसून येत आहे.
मेट्रोच्या गोदामातून साहित्य चोरणारे चोरटे गजाआड
पुणे : मेट्रोच्या गोदामातून सहा लाख २८ हजारांचे साहित्य चोरून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. खडकी परिसरातही घटना घडली.
तातडीने पदभरती करा; अन्यथा कारवाई… विद्यापीठाचा महाविद्यालयांना इशारा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांनी संचालक, प्राचार्य आणि प्राध्यापकांची पदे भरली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
लष्कर भागातील इस्ट स्ट्रीट परिसरात वाहतूक बदल, खाणे मारुती चौकात मलनिस्सारण वाहिनीचे काम
पुणे : लष्कर भागातील कृष्ण कन्हैय्या सोसायटी ते खाणे मारुती चौक दरम्यान मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार असून, या भागातील वाहतूक व्यवस्थेत २ एप्रिलपर्यंत वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
अबू आझमी यांच्या विरोधात पुण्यातील स्वारगेट चौकात शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे म्हटले आहे.त्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहे.तर अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यातील स्वारगेट चौकात शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.तसेच यावेळी अबू आझमी यांचा पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला.
भेदभाव रोखण्यासाठीच्या नियमावलीचा यूजीसीकडून मसुदा जाहीर, समान संधी केंद्र प्रस्तावित
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करण्यासाठीच्या नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे. वंचित गटांसाठीची धोरणे व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर लक्ष देण्याचा या केंद्राचा उद्देश असून, शिक्षण संस्थांमध्ये समान संधी केंद्रांची रचना, कार्यपद्धती, समता पथकाची स्थापना, हेल्पलाइन सुरू करणे, समतादूत नियुक्ती करण्याचे या मसुद्याद्वारे प्रस्तावित करण्यात आले आहे.
पोषण आहार योजनेत प्रतिविद्यार्थी खर्चाची दरवाढ; १ मार्चपासून नवे दर लागू
पुणे : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील प्रतिविद्यार्थी प्रतिदिन आहार खर्चाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; आमदार महेश लांडगे यांची विधानसभेत मागणी
पिंपरी : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यासारख्या धर्मांध लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आझमी प्रवृत्तीला ठेचून काढावे. आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत केली.
‘ते’ होर्डिंग जमीनदोस्त, नक्की प्रकार काय?
पुणे : महापालिकेची परवानगी न घेता छत्रपती संभाजी महाराज पुलालगत उभारण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंगचा सांगाडा महापालिका प्रशासनाने पाडून टाकला. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी संबधित व्यक्ती हे होर्डिंग उभारत असून, प्रशासनाला न जुमानता हे काम सुरू होते.
अरे देवा.. साडेबारा हजार कोटींच्या अंदाजपत्रकात चक्क ३० हजार कोटींच्या कामांची शिफारस!
पुणे : महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना आमदार, माजी नगरसेवक यांच्यासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निधी देण्याची पत्रे महापालिकेला दिली होती. ३० हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची शिफारस या पत्रांमध्ये करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.
महापालिकेचे अंदाजपत्रक यामुळे पोहचले १२ हजार ६१८ कोटींच्या घरात!
पुणे : महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुणे महापालिकेचे १२ हजार ६१८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. स्थायी समितीसमोर सादर केलेल्या २०२५-२६ या वर्षाच्या अंदाजपत्रकात मिळकतकरात, तसेच अन्य कोणत्याही करात वाढ न करता पुणेकरांना दिलासा दिला आहे.
पिंपरी- चिंचवड : बंगल्याचा सातबारा नोंदवण्यासाठी ५ लाखांची मागणी; मंडल अधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात
पिंपरी- चिंचवडमध्ये चार लाखाची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे. सुरेंद्र साहेबराव जाधव अस रंगे हात पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. ही कारवाई आज मंगळवारी चिंचवड येथे करण्यात आली आहे.
अंदाजपत्रकात सर्वाधिक निधी मिळाला ‘या’ कामासाठी!
पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पथ आणि वाहतूक नियोजन या विभागांना सर्वाधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या दोन्ही विभागांना मिळून अंदाजपत्रकामध्ये २ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे पुढील काळात रस्त्यांची आणि वाहतुकीची कामे मार्गी लागून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आता आंद्रा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी
पिंपरी : आंद्रा धरणातून शहरासाठी दररोज शंभर दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा कोटा मंजूर असतानाही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणापासून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजन केले आहे.
पिंपरी : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात ‘एआय’चा वापर
पिंपरी : ‘आजचे जग वेगाने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा सुविधांमध्ये परिवर्तीत होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर सर्व स्तरावर केला जात आहे. अशावेळी महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजातही ‘एआय’तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिका