Latest News in Pune Today Live : राज्यातील सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आणि परिसरात वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे वाढते गुन्हे, प्रदुषण, पाणी टंचाई, वाहतुक कोंडी अशा प्रकारच्या विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा पुणे शहर, परिसर तसेच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत…
Pune Maharashtra News 6 March 2025
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आठ मार्चचा मोर्चा रद्द करुन रविवारी काढणार…!
बारामती : बीड येथील घटनेमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन आठ मार्च शनिवार रोजी करण्यात आले होते तो आता रद्द करुन नऊ मार्च रोजी रविवारी हा सर्वं धार्मिय मोर्चा काढला जाणार आहे.
वैशाली पतंगे यांना पहिला चैत्राली सन्मान पुरस्कार
पुणे : ‘विचार आणि तर्काची चौकट कोरडी असते. भावनेच्या आधाराने केलेली कामे सातत्याने सुरू राहतात. त्यामुळे काम करताना विचार आणि तर्कासोबत भावनेची जोडही असायला हवी,’ असे मत जीएसटी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे यांनी बुधवारी व्यक्त केले.
आमिष दाखवून १२५ कोटींची फसवणूक; दुबईला पसार झालेल्या दाम्पत्याविरुद्ध अटक वॉरंट
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुणे शहरातील गुंतवणूकदारांची १२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्यानंतर दुबईत पसार झालेले आरोपी अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा यांच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजाविले आहे.
सहकारनगरमध्ये महिलेकडील एक लाखांची रोकड चोरी
पुणे : दुचाकीस्वार महिलेकडील एक लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सहकारनगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आठ मार्चला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत सर्वं धर्मीय मोर्चा
बारामती : बीड येथील घटनेमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन आठ मार्च रोजी करण्यात आले आहे. शनिवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे, याच दिवशी महिला दिनाच्या औचित्य साधून सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
वडगाव शेरी, खराडीचा पाणी पुरवठा झाला बंद, हे आहे कारण!
पुणे : पुणे शहराचा पूर्वेकडील भाग अशी ओळख असलेल्या खराडी, वडगाव शेरी, विमान नगर परिसरातील नागरिकांना सध्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा आसखेड धरणातील पाणी शहराला मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे.
पश्चिम घाटातील झाडांच्या वाढीबाबत महत्त्वाचे संशोधन… काय आहेत निष्कर्ष?
पुणे : जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटातील डोंगरांवरील झाडांची घनता केवळ पावसावर नाही, तर डोंगर उताराच्या दिशेवरही अवलंबून असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रत्यक्ष संवादाचा अनुभव; ‘आस्क एआय होलोबॉक्स’ कार्यान्वित
पुणे : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक येथे देशाची राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी ‘आस्क एआय होलोबॉक्स’ कार्यान्वित केला आहे.
माजी सभागृह नेत्यांनीच घेतला घसघशीत निधी, नक्की प्रकार काय?
पुणे : महापालिकेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या महापालिकेतील माजी सभागृह नेत्यांनीच घसघशीत निधी पदरात पाडून घेतला आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
नवउद्योजकांना कोणी कर्ज देता का कर्ज?
तरुणांमध्ये नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. मात्र, या योजनांमधील लाभार्थी आता वेगळ्याच चक्रात अडकले आहेत. बँका त्यांना कर्जच देत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
हिंजवडी ‘आयटी पार्क’ अडचणीत! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल
पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक (आयटी) पार्ककडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. आयटी पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी मुळा नदीत थेट सोडले जात असल्याचा ठपका ठेवणारी नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती.
आता आठ दिवसातच एचएसआरपी बसून मिळणार; पुणे आरटीओचे काय आहे नियोजन?
पुणे : पुणे उप प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्यासाठीच्या केंद्रांत वाढ केली आहे. आरटीओने दिलेल्या मुदतीच्या दिवसात घट होत असून, नोंदणीधारकांच्या प्रतीक्षेचा कालावधी ३० दिवसांहून अधिक आहे.
स्वारगेटसह उपमुख्यमंत्र्यांच्या बारामती बस स्थानकात सुरक्षेचा अभाव
पुणे : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर नेमण्यात आलेल्या समितीचा सुरक्षाविषयक लेखापरीक्षण अहवाल बुधवारी (५ मार्च) राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. शहर आणि जिल्ह्यातील १४ आगारांमधील ४२ बसस्थानकांचे लेखापरीक्षण करण्यात आले असून यामध्ये घटना घडलेल्या स्वारगेट बसस्थानकासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील बस स्थानकामध्येही सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
पर्यावरणाविषयी संवेदनशीलता हवी… वाचा काय म्हणाले ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे
पुणे : ‘पर्यावरणाचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता निर्माण व्हायला हवी. पर्यावरण संवर्धनासाठी योग्य पावले न उचलल्यास मनुष्यजातीचा अंत समीप आहे,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी बुधवारी व्यक्त केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेची महिला सक्षमीकरणातही मोठी भूमिका
येत्या शनिवारी साजऱ्या होत असलेल्या महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला सक्षमीकरण या विषयावर ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी तुषार सूर्यवंशी यांच्याशी साधलेला संवाद…
तीन दिवसांत ९०४ बांधकामांवर कारवाई
पुणे : शहर आणि परिसरातील राष्ट्रीय, राज्य मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत गेल्या तीन दिवसांत ९०४ अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दोन भुयारी मार्गाचा प्रस्ताव
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद तसेच सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी मांडला आहे.
पुणे पोलीस दलात लवकरच ‘सर्व्हेलन्स व्हेईकल’
पुणे : शहरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेली पाच वाहने (सर्व्हेलन्स व्हेईकल) घेण्यात येणार आहेत.
ताथवडे, मारुंजी परिसरातील रहिवाशांचा शनिवारी मूक मोर्चा
पिंपरी : ताथवडे आणि मारुंजी परिसरातील हवेचे प्रदूषण वाढले असून, जड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नांकडे पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पीएमआरडीएचे लक्ष वेधण्यासाठी या परिसरातील ५० हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी, तसेच हिंजवडी आयटी पार्कमध्ये कामाला असलेले आणि या परिसरात राहणारे अभियंते येत्या शनिवारी (८ मार्च) मूक मोर्चा काढणार आहेत.
प्रियकराबरोबर लग्न करण्यासाठी पतीचा खून; पत्नीसह प्रियकर अटकेत
पिंपरी : डुडुळगाव येथे चाकूने भोसकून झालेल्या ट्रकचालकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला पाच दिवसांत यश आले. प्रियकराबरोबर लग्न करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पत्नीने खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
उजनी धरणात गोयेगाव ते अगोती पुलासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी
इंदापूर : इंदापूर व करमाळा तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी गोयेगाव (ता. करमाळा) ते आगोती (ता इंदापूर) दरम्यान उजनी जलाशयात पूल करण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी अशी मागणी करमाळ्याचे शिवसेना नेते( शिंदे गट) दिग्विजय बागल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे निवेदनाद्वारे केली आहे.
बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाखांची लाच
पिंपरी : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंडलाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चिंचवड येथे पकडले.
सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये पिंपरी पालिका राज्यात अव्वल
पिंपरी : कुटुंबकल्याण, मातृ व बालसंगोपन, नियमित लसीकरण आदी सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्य कुटुंबकल्याण कार्यालयाने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. महापालिकेला ९२ गुण मिळाले आहेत.
लोणावळा आयुक्तालयाच्या हद्दीबाहेरच? पिंपरी-चिंचवडमध्ये समावेश करण्यास गृह विभागाचा नकार
पिंपरी : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अखत्यारित असलेल्या मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण या चार पोलीस ठाण्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडण्याबाबत गृह विभाग सकारात्मक नाही.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय