Latest News in Pune Today : पुणे शहरातील वाहतुकीचा वेग वाढावा आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटावी, म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘बस रॅपिड ट्रान्सपोर्ट’ (बीआरटी) अर्थात जलद वाहतूक योजनेचीच ‘कोंडी’ झाली असून, या योजनेची व्याप्ती शहरात आता काही रस्त्यांपुरतीच उरली आहे. तर दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसर आणि त्याच्या सभोवतालच्या १०० मीटरपर्यंतच्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय दोन किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश ९/४/२०२५ ते १९/४/२०२५ पर्यंत लागू असणार असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले. तेव्हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मावळ तसंच पुणे जिल्ह्यातील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…
Pune Maharashtra News Today, 9 April 2025
‘वर्षारंभ विशेषांक’, ‘नवा शुक्रतारा’ आणि ‘व्यसनमुक्ती कार्यकर्ता’…
मराठीमध्ये दिवाळी अंकाची समृद्ध परंपरा आहे. त्या धर्तीवर वाचन संस्कृतीच्या प्रचारासाठी कार्यरत ‘भावार्थ’ने वाचकांच्या हाती वर्षारंभ विशेषांकाची भेट सुपूर्द केली आहे… ‘शुक्रतारा’ या गीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे अरुण दाते यांच्या लोकप्रिय भावगीतांची नवी पालवी असलेल्या ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमाने शताब्दी प्रयोगाची वाटचाल केली आहे.
जुळ्या मुलांचा आईकडून खून; पाण्याच्या टाकीत बुडवून मुलांना मारले, आईचा आत्महत्येचा प्रयत्न
जुळ्या मुलांची वाढ नीट होत नसल्याने आईने त्यांना घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरात घडली. जुळ्या मुलांना टाकीत बुडविल्यानंतर आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
भाजपच्या बैठकीत पक्षशिस्तीवर ‘चिंतन’, चंद्रकांत पाटील, मोहोळांकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावरून खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षशिस्तीवर ‘चिंतन’ करण्यात आले. सविस्तर वाचा…
वारजे भागात शाॅर्टसर्किट होऊन घरात आग लागल्याने वडिलांसह मुलाचा मृत्यू, आग लागल्यानंतर सिलिंडरचा स्फोट
शाॅर्टसर्किट झाल्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागातील गोकुळनगर परिसरात मध्यरात्री घडली.मोहन माणिक चव्हाण (वय ४३), आतिश मोहन चव्हाण (वय २३ दोघे सध्या रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सविस्तर वाचा…
पिंपरी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या भरतीची अंतिम यादी प्रसिद्ध; पहिल्या दिवशी २५ फायरमन रुजू
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलातील अग्निशामक विमोचक (फायरमन रेस्क्युअर) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन परीक्षेला सात, तर मैदानी परीक्षेला दोन महिने होऊन गेल्यानंतर महापालिकेने ही कार्यवाही केली आहे. सविस्तर वाचा…
शहरात ‘बीआरटी’चीच ‘कोंडी’; वाहतूककोंडी सोडविण्यासाठीची योजना काही ठिकाणी बासनात
शहरातील वाहतुकीचा वेग वाढावा आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटावी, म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘बस रॅपिड ट्रान्सपोर्ट’ (बीआरटी) अर्थात जलद वाहतूक योजनेचीच ‘कोंडी’ झाली असून, या योजनेची व्याप्ती शहरात आता काही रस्त्यांपुरतीच उरली आहे.
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स

पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स
