Pune Breaking News LIVE Updates : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त देहू संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.तसेच पुणे परिसरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या, राजकीय घडामोडी तसंच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही इथे मिळेल…
Pune Maharashtra News Today 17 march 2025
आश्रमातील मुलांना त्वरित आधार कार्ड मिळणे गरजेचे; न्यायाधीश अभय ओक
जेजुरी: ज्येष्ठ समाजसेविका स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमातील मुलांना आधार कार्ड मिळत नसल्याबद्दल न्यायमूर्ती अभय ओक यांनी खंत व्यक्त केली.आपण जिल्हा विधी सेवा केंद्राकडून अनाथ मुलांच्या आधार कार्डसाठी स्वतंत्र यादी तयार करून दिल्लीला पाठवावी, त्यावर आपण तात्काळ निर्णय घेऊन निराधारांना आधार कार्ड देऊ असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी सासवड येथील कार्यक्रमात सांगितले.
स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाचा लॅपटाॅप चोरीला
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.याबाबत रितेश गजानन बकरे (वय २०) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हे रविवारी स्वारगेट एसटी स्थानकातून साताऱ्याकडे निघाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारात ते फलाटावर एसटी बसची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी त्यांची नजर चुकवून लॅपटाॅप असलेली पिशवी चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक निकिता पवार तपास करत आहेत. गेल्या आठवड्यात महाडला निघालेल्या एका प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरुन नेल्याची घटना घडली होती. प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पुन्हा प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरीची आणखी एक घटना घडली.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी प्रवासी तरुणीला धमकावून दत्तात्रय गाडे याने बलात्कार केला होता. बलात्काराची घटना घडल्यानंतर स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली हाेती. आवारात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली, तसेच बंदोबस्तास पोलीस तैनात करण्यात आले. बंदोबस्त वाढविल्यानंतर एसटी स्थानकाच्या आवरात प्रवाशांकडील ऐवज, लॅपटाॅप चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा नियोजन समितीसाठी महायुतीची होणार कसरत ? हे आहे कारण
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडणार असल्याचे संकेत मिळण्यास सुरुवात झाल्याने इच्छुकांनी जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष यांचे महायुतीचे सरकार आहे.
किरकोळ बाजारात एक लिंबू दहा रुपयांना, उन्हाचा चटका वाढल्याने मागणीत वाढ
पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांच्या मागणीत माेठी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात रसवंतीगृह चालक, सरबत विक्रेते, तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री आठ ते दहा रुपये दराने केली जात आहे.
सविस्तर वाचा
शेवग्याच्या दरात मोठी घसरण, किरकोळ बाजारात ४० रुपये किलो
पुणे : थंडीत सहाशे रुपये किलो असे उच्चांकी दर मिळालेल्या शेवग्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेवग्याची बाजारात मुबलक आवक होत असून, किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला ४० ते ५० रुपये किलो असे दर मिळाले आहेत.
पुरंदर विमानतळासाठी ही सात गावे औद्योगिक क्षेत्र म्हणून…मात्र अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने संभ्रम
पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दोन हजार ८३२ हेक्टर जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र, अर्थसंकल्पात कुठल्याच प्रकारची तरतूद किंवा उल्लेख झाला नसल्याने विमानतळाच्या प्रत्यक्ष भूसंपादनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
पुणे लाईव्ह