Pune Breaking News Updates : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त देहू संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.तसेच पुणे परिसरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या, राजकीय घडामोडी तसंच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही इथे मिळेल…


Live Updates

Pune Maharashtra News Today 17 march 2025

17:59 (IST) 17 Mar 2025

पिंपरी-चिंचवड: सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सराफाला देखील बेड्या

दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता.

सविस्तर वाचा…

17:49 (IST) 17 Mar 2025

पिंपरी-चिंचवड: खासदार श्रीरंग बारणेंचं फेसबुक पेज हॅक! सायबर पोलिसांकडे तक्रार

एखाद्याचे फेसबुक अकाऊंट, पेज हॅक करून नंतर मित्र परिवाराला पैसे मागण्याच्या घटना अनेकदा घडतात.

सविस्तर वाचा…

17:25 (IST) 17 Mar 2025

छत्रपतींचे कार्य डोळ्यासमोर ठेवा : हर्षवर्धन पाटील यांची ‘शिवगर्जना’

छत्रपती शिवरायांचे, छत्रपती संभाजी राजांचे ध्येय व कार्य डोळ्यासमोर ठेवा.  कार्यकर्त्यांनो नाउमेद होऊ नका .छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळे एकत्र करून महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केले. सविस्तर वाचा…

17:24 (IST) 17 Mar 2025

पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात; पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त

पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीनाला समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. दारुवाला पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली. अल्पवयीनाकडे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दारूवाला पूल परिसरात सापळा लावला. टिळक आयुर्वेद महाविद्यालयाजवळ असलेल्या नागझरी नाल्याजवळ अल्पवयीन थांबला होता. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल सापडले. पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, रहीम शेख, अमोल गावडे, शिवा कांबळे, कल्याण बोराडे, भाग्येश यादव यांनी ही कारवाई केली.

17:02 (IST) 17 Mar 2025

‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सव‘ २४ मार्चपासून तीन दिवस; ‘राम नदी सेवक‘ सन्मान डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांना

पुणे : राम नदीशी नाते निर्माण व्हावे, तिच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा आणि तिची स्वच्छता राखण्यासाठी तरुण पिढी प्रेरीत व्हावी या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या ‘राम नदी पुनरूज्जीवन अभिमान’ ला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून पाचवा ऑनलाईन ‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सव‘ २४ मार्चपासून तीन दिवस दररोज एक तास प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

16:46 (IST) 17 Mar 2025

बीज सोहळ्यानंतर देहूत डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान; १६ टन कचऱ्याचे संकलन

पिंपरी : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने  सोमवारी श्री क्षेत्र देहूगाव आणि भंडारा डोंगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात १६ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

सविस्तर वाचा

16:30 (IST) 17 Mar 2025

तिथीनुसार शिवजयंती निमित्त ८ महिलांना शिवदुर्गा सन्मान पुरस्कार व अभिवादन सभेचे आयोजनासह ढोल ताश्याचा गजर व जयघोष

शिरुर: तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने शहरातील ८ महिलांचा शिवदुर्गा सन्मान पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.जुन्या नगरपरिषद कार्यालया जवळ शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

सविस्तर वाचा

14:50 (IST) 17 Mar 2025

शिरूर: पोलीसांनी बुलेटच्या ३५ सायलेन्सर वर फिरविला रोड रोलर

शिरूर : रस्त्यावरुन बुलेट चालवत सायलेन्सरचा मोठा आवाज व फटाके फोडणारे किंवा कर्कश आवाज करणारे बुलेट चे सायलेन्सर पोलीसांनी कारवाई करत  जप्त केले होते . अश्या ३५  सायलेन्सरची  रोड रोलर च्या मदतीने  विल्हेवाट लावण्यात आली असून यापुढे ही अशी कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले .

सविस्तर वाचा

13:39 (IST) 17 Mar 2025

स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाचा लॅपटाॅप चोरीला

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.याबाबत रितेश गजानन बकरे (वय २०) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सविस्तर वाचा

12:42 (IST) 17 Mar 2025

आश्रमातील मुलांना त्वरित आधार कार्ड मिळणे गरजेचे; न्यायाधीश अभय ओक

जेजुरी: ज्येष्ठ समाजसेविका स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमातील मुलांना आधार कार्ड मिळत नसल्याबद्दल न्यायमूर्ती अभय ओक यांनी खंत व्यक्त केली.आपण जिल्हा विधी सेवा केंद्राकडून अनाथ मुलांच्या आधार कार्डसाठी स्वतंत्र यादी तयार करून दिल्लीला पाठवावी, त्यावर आपण तात्काळ निर्णय घेऊन निराधारांना आधार कार्ड देऊ असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी सासवड येथील कार्यक्रमात सांगितले.

सविस्तर वाचा

09:54 (IST) 17 Mar 2025

स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाचा लॅपटाॅप चोरीला

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.याबाबत रितेश गजानन बकरे (वय २०) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हे रविवारी स्वारगेट एसटी स्थानकातून साताऱ्याकडे निघाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारात ते फलाटावर एसटी बसची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी त्यांची नजर चुकवून लॅपटाॅप असलेली पिशवी चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक निकिता पवार तपास करत आहेत. गेल्या आठवड्यात महाडला निघालेल्या एका प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरुन नेल्याची घटना घडली होती. प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पुन्हा प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरीची आणखी एक घटना घडली.

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी प्रवासी तरुणीला धमकावून दत्तात्रय गाडे याने बलात्कार केला होता. बलात्काराची घटना घडल्यानंतर स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली हाेती. आवारात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली, तसेच बंदोबस्तास पोलीस तैनात करण्यात आले. बंदोबस्त वाढविल्यानंतर एसटी स्थानकाच्या आवरात प्रवाशांकडील ऐवज, लॅपटाॅप चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याचे दिसून आले आहे.

09:32 (IST) 17 Mar 2025

जिल्हा नियोजन समितीसाठी महायुतीची होणार कसरत ? हे आहे कारण

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडणार असल्याचे संकेत मिळण्यास सुरुवात झाल्याने इच्छुकांनी जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष यांचे महायुतीचे सरकार आहे.

सविस्तर वाचा

09:32 (IST) 17 Mar 2025

किरकोळ बाजारात एक लिंबू दहा रुपयांना, उन्हाचा चटका वाढल्याने मागणीत वाढ

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांच्या मागणीत माेठी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात रसवंतीगृह चालक, सरबत विक्रेते, तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री आठ ते दहा रुपये दराने केली जात आहे.

सविस्तर वाचा

09:18 (IST) 17 Mar 2025

शेवग्याच्या दरात मोठी घसरण, किरकोळ बाजारात ४० रुपये किलो

पुणे : थंडीत सहाशे रुपये किलो असे उच्चांकी दर मिळालेल्या शेवग्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेवग्याची बाजारात मुबलक आवक होत असून, किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला ४० ते ५० रुपये किलो असे दर मिळाले आहेत.

सविस्तर वाचा

09:07 (IST) 17 Mar 2025

पुरंदर विमानतळासाठी ही सात गावे औद्योगिक क्षेत्र म्हणून…मात्र अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने संभ्रम

पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दोन हजार ८३२ हेक्टर जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र, अर्थसंकल्पात कुठल्याच प्रकारची तरतूद किंवा उल्लेख झाला नसल्याने विमानतळाच्या प्रत्यक्ष भूसंपादनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा

पुणे लाईव्ह

पुणे