पुणे : सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहर आहे. पुण्यातील कायदा-सुव्यवस्था, रोजगार, व्यवसायात चांगली संधी असल्याने परराज्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागातील नागरिक पुण्यात स्थायिक होण्यास प्राधान्य देत आहेत, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केले. पुणे पोलीस आणि विघ्नहर्ता न्यासतर्फे गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचा पारितोषिक समारंभ पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, रामनाथ पोकळे, डाॅ. जालिंदर सुपेकर, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहिदास पवार, आर. राजा, भाग्यश्री नवटके, राहुल श्रीरामे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे शहरात स्थायिक होणाऱ्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे; तसेच नागरिकांच्या सुरक्षेला पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जटील होत चालली आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीला ६०० स्वयंसेवक देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. करोना संसर्गामुळे गेले दोन वर्षे गणेशोत्सवावर निर्बंध होते. यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळांनी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी नमूद केले.

उत्सव निर्बंधमुक्त; काहीजणांकडून गैरफायदा

गेले दोन वर्षे गणेशोत्सवावर निर्बंध होते. यंदा दहीहंडी, गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उत्सव शांततेत पार पडला. मात्र, काहीजणांनी निर्बंधमुक्त उत्सवाचा गैरफायदा घेतला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.