पुणे : शहरातील ८०पैकी ४० स्मशानभूमींमध्ये पायाभूत सुविधांची वानवा असल्याची आणि बहुतांश स्मशानभूमींत विद्युतदाहिनी, गॅसदाहिनीच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याची बाब नागरी सामाजिक संघटना आणि व्यक्तींनी केलेल्या तपासणीतून पुढे आली आहे. स्मशानभूमीची दुरवस्था, पायाभूत सुविधा यांबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून, खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांना योग्य त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र दिले आहे.

नागरिकांनी पुढाकार घेतलेल्या पुणे एअर हब या अंतर्गत स्मशानभूमींची तपासणी करण्यात आली. पुणे एअर हबमध्ये परिसर, सेंटर फाॅर एन्व्हाॅयरमेंन्ट एज्युकेशन, प्रयास आरोग्य गट, समुचित, हिंजवडी रेसिडन्ट्स वेलफेअर असोसिएशन (हिरवा) या संघटना आणि व्यक्तींचा समावेश आहे. स्मशानभूमीमध्ये लाकूड, गॅस आणि विजेचा वापर किती प्रमाणात होतो, या निकषावर सदस्यांनी निरीक्षणे नोंदविली. त्यामध्ये स्मशानभूमी परिसराची पाहणी करून परिसरात पुरेशी झाडे आहेत का, त्यांची देखभाल केली जाते का, पाण्याची उपलब्धता किती प्रमाणात आहे, पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे आहेत का, मृत्यूचा पास कशा प्रकारे मिळतो, माहिती मिळविण्यासाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहे का या निकषांवर निरीक्षणे नोंदविण्यात आली.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

रहिवाशांना प्रदूषणाचा त्रास

शहरातील ५० टक्क्यांहून अधिक दहनविधी वैकुंठ स्मशानभूमीत होतात. ही स्मशानभूमी मध्यवर्ती भागात असल्याने, तसेच तिच्या अतिवापरामुळे परिसर दूषित झाला आहे. हवा प्रदूषण नियंत्रण (एपीसी) यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याने आणि धुराड्याच्या चिमणीच्या उंचीबाबत शंका असल्याने प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. स्मशानभूमीत विद्युतदाहिन्यांची कमतरता आहे. दाहिन्यांमध्ये लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. प्रदूषणाला आळा घालण्याच्या प्रयत्नांमध्येही मोठी दरी असून, जुन्या स्मशानभूमी परिसरात घनदाट लोकवस्तीचे निवासी भाग निर्माण झाले आहेत. रहिवाशांना स्मशानभूमीतील प्रदूषणाचा फटका बसत आहे, असे निरीक्षण अभ्यास गटाच्या पाहणीतून पुढे आल्याची माहिती ‘परिसर’ संस्थेच्या श्वेता वेर्णेकर आणि शर्मिला देव यांनी दिली.

प्रमुख निरीक्षणे

– ८३ खुल्या दाहिन्यांमध्ये हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचा अभाव

– ४० स्मशानभूमींपैकी केवळ सात ठिकाणी विद्युतदाहिनी, तर १६ ठिकाणी गॅस दाहिनीची सुविधा

– ४५ टक्के स्मशानभूमींतच स्वच्छतागृह

– ४७ टक्के स्मशानभूमींमधील परिसर स्वच्छ

अहवालातील प्रमुख शिफारशी

– स्मशानभमीत पेयजल, स्वच्छ स्वच्छतागृहे आणि पायाभूत सुविधा पुरविणे

– लाकडाच्या चितेऐवजी विद्युतदाहिनी आणि गॅसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कारांचे प्रमाण वाढविणे

– स्मशानभूमींचे वाॅर्डनिहाय विक्रेंद्रीकरण करणे

– सेवा सुधारण्यासाठी नागरिकांचा अभिप्राय सातत्याने घेणे

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र

स्मशानभूमीतील सुविधांच्या अभावाबाबत खासदार ॲड. वंदना चव्हाण यांना अहवाल देण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी संसेदत प्रश्न विचारला असून, ॲड. चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. अहवालातील प्रमुख निरीक्षणासंदर्भात चर्चा आणि शिफारशी स्वीकारण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच चव्हाण यांनी काही तांत्रिक शिफारशींसह केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पत्र दिले आहे.