पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवारांकडून पैशाचा गैरवापर होत असल्याचे प्रकार उघडकीस येतात. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयाने पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांकडून पैशाचा गैरवापर होऊ नये, यासाठी प्राप्तिकर विभागाने पावले उचलली आहेत. निवडणूक मुक्त आणि योग्य पद्धतीने व्हाव्यात यासाठी प्राप्तिकर विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्राप्तिकर विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून निवडणुकीतील पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवले जात आहे. याचबरोबर निवडणुकीतील गैरप्रकारांच्या तक्रारी नागरिकांना करता याव्यात यासाठी टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०३५३ व १८००२३३०३५४ सुरू करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना आमदारकीची संधी का मिळाली नाही? स्वतःच खुलासा करत म्हणाल्या…

याचबरोबर नागरिक मोबाईल क्रमांक ९४२१५४६४८४ वर संदेश, व्हिडीओ आणि छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून तक्रार करू शकतात. प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयाच्या अंतर्गत पुण्यासह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अहिल्यादेवीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील नागरिक तक्रार करू शकतात. नागरी ई-मेल अथवा पत्र पाठवूनही तक्रार नोंदवू शकतात, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली.

दरम्यान, महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा १६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत १३ व २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांत २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

हेही वाचा – Kothrud Assembly Constituency : चंद्रकांत पाटील पुन्हा बाजी मारणार का? कोथरूडमध्ये कुणाचं पारडं जड मविआ की महायुती?

तक्रार कुठे कराल?

  • टोल फ्री क्रमांक – १८००२३३०३५३
  • टोल फ्री क्रमांक – १८००२३३०३५४
  • व्हॉट्सअप क्रमांक – ९४२१५४६४८४
  • ई-मेल आयडी – pune.pdit.inv@incometax.gov.in
  • पत्ता – नियंत्रण कक्ष, खोली क्रमांक ८२९,
    आठवा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर,
    सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे ४११०३७
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune office of income tax department has undertaken a campaign to prevent misuse of money pune print news stj 05 ssb