देशातील आनंदी शहरांत राज्यातील तीन शहरे; नागपूर, मुंबईचा समावेश

पुणे : देशातील ३४ आनंदी शहरांच्या यादीमध्ये राज्यातील तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आनंदी शहरांच्या यादीत पुणे शहराने मुंबई आणि नागपूर शहरांना मागे टाकले आहे. देशातील आनंदी शहरांमध्ये पुणे १२ व्या स्थानी असून नागपूर १७ व्या आणि मुंबई २१ व्या स्थानी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आनंदी शहरांमध्ये लुधियाना अव्वल ठरले आहे. अहमदाबाद आणि चंदिगड शहरे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
247 best buses accidents reported in 3 years
तीन वर्षांत २४७ अपघात; ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या सर्वाधिक दुर्घटना
Bus services stopped in Kurla West after BEST bus accident mumabi news
कुर्ला स्थानकातील बेस्ट सेवा बुधवारीही बंद; प्रवाशांचे हाल
2160 BEST buses scrapped in five years Mumbai print news
पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात, केवळ ३७ नव्या बसची खरेदी
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…

‘इंडियन सिटिज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’मध्ये आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रा. राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांतील १३ हजाराहून अधिक नागरिकांशी चर्चा करून ही यादी तयार के ली आहे. गेल्या अनेक दशकांपासून व्यवस्थापनासंदर्भातील संशोधनामध्ये राजेश कार्यरत आहेत. देशातील वेगवेगळ्या शहरांमधील हॅपीनेस इंडेक्स म्हणजे आनंदी राहण्याच्या प्रमाणासंदर्भातील माहिती या माध्यमातून प्रथमच समोर आली आहे.  वयोमान, शिक्षण, कमाई आणि शहरात वास्तव्य करताना मिळणाऱ्या सोई-सुविधा तसेच जीवनशैली या निकषांच्या आधारे आनंदी शहरांची यादी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोठय़ा शहरांध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा जास्त आनंदी असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर या यादीमध्ये १२ व्या स्थानी आहे. देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये पुण्याबरोबरच नागपूर आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेले मुंबई शहर या यादीमध्ये २१ व्या स्थानी आहे, तर उपराजधानी नागपूर १७ व्या स्थानी आहे. त्यामुळे आनंदी राहण्यामध्ये पुणेकरांनी नागपूरकर आणि मुंबईकरांनाही मागे टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

आनंदी शहरांची क्रमानुसार यादी

लुधियाना, अहमदाबाद, चंदिगड, सुरत, वडोदरा, अमृतसर, चेन्नई, जयपूर, जोधपूर, हैदराबाद, भोपाळ, पुणे, नवी दिल्ली, डेहराडून, फरिदाबाद, पाटणा, नागपूर, इंदूर, कोची, भुवनेश्वर, मुंबई, गुवाहटी, धनबाद, नोएडा, जम्मू, कानपूर, बंगळूरू, कोलकता, लखनऊ, शिमला, रांची, गुरुग्राम, विशाखापट्टणम, रायपूर

देशातील आनंदी शहरात पुण्याचा समावेश होणे ही आनंदाची बाब आहे. नागरिकांना उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिके कडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांचे राहणीमान आणि जीवनमान उंचाविण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. या दृष्टीने वास्तव्याच्या दृष्टीनेही पुण्याला नेहमी पसंती मिळत आहे. नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

निवासाच्या दृष्टीने देशातील सर्वात उत्तम आणि क्रमांक एकचे शहर म्हणून पुण्याची निवड झाली होती. आता आनंदी शहराच्या यादीत पुण्याने स्थान मिळविणे ही आनंददायी गोष्ट आहे. या यादीत आणखी पुढे जाण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि रोजगार निर्मितीचे केंद्र अशी शहराची राष्ट्रीय पातळीवरील ओळख आहे. सर्वाना सामावून घेणे हे महानगराचे वैशिष्टय़ आणि शहराची संस्कृती सर्वाना आनंदी बनवित आहे.

सतीश मगर, व्यवस्थापकीय संचालक, मगरपट्टा सिटी ग्रुप

Story img Loader