पुणे : अथर्वशीर्ष पठणानिमित्त रविवारी (८ सप्टेंबर) पहाटे मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून ऋषीपंचमीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात महिला भाविक सहभागी होत असल्याने मध्यभागातील छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते रामेश्वर मंदिर चौक दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौक, जिजामाता चौक, फडके हौद चौक, देवजीबाबा चाैक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रस्ता, गोविंद हलवाई चौकातून उजवीकडे वळून मंडईतील गोटीराम भैय्या चौकमार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी रस्त्यावर यावे. तेथून स्वारगेटकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

हेही वाचा – पुणे : गुलटेकडीत किरकोळ वादातून तरुणावर कात्रीने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक

हेही वाचा – Ganeshotsav 2024: ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे जल्लोषात स्वागत, मानाच्या गणपतींची विधिवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना

अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक, सोन्या मारुती चौकातील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. या भागातील वाहनांनी सोन्यामारुती चौकमार्गे बोहरी आळी, नेहरु चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune on the occasion of atharvashirsha pathan there will be traffic changes in central tomorrow morning pune print news rbk 25 ssb