निगडी येथे भर दिवसा एका व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. येथील अजंठानगर भागात ही घटना घडली. आर्थिक देवाण-घेवाणीतून ही घटना घडली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, नंदू चव्हाण असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुपारी जेवण केल्यानंतर नंदू कामावर जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, एका पानाच्या टपरीवर ते सिगारेट ओढण्यासाठी थांबले. त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ला इतका भयंकर होता की यात नंदू यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम आणि प्रकार यावरुन आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाला असावा असा संशय निगडी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune one person murdered in sharp weapon the police suspect that the it happened of financial purpose
Show comments