पुणे : डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंद्रजीत निवृत्ती सरडे (वय ५८, रा. उबाळेनगर, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत सरडे यांचा मुलगा समाधान (वय २०) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी डंपरचालक राजू पांडू चव्हाण (वय २४, रा. सुयोगनगर, भावडी रस्ता, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत सरडे यांचा दुध विक्रीचा व्यवसाय आहे. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ते सोसायटीत दूध विक्री करुन घरी निघाले होते. वाघोलीतील उबाळेनगर परिसरात भरधाव डंपरने सरडे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरडे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

हेही वाचा – पुणे : पादचारी दिनासाठी शहरातील इतक्या चौकांमध्ये फक्त रंगरंगोटीच !

हेही वाचा – पुणे : अभ्यासिकेला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर महापालिकेने घेतला मोठा निर्णय !

अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करत आहेत. नगर रस्ता भागात गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pedestrian died by hit with dumper on city road pune print news rbk 25 ssb