पुण्यातील रेव्हेन्यू कॉलनीत पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने आज महापौर बंगल्याच्या आवारात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, तुम्हाला त्रास झाल्याबद्दल दिलगीर व्यक्त करते. दिवाळीमध्ये त्रास होणार नाही याची व्यवस्था करीत आहोत. तसेच पाणी येताना जलवाहिनीत हवा पकडली जाते.

पुणे शहरातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पाणी नियमित वेळेत येत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असताना. त्याच दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाकडून कालवा समिती मध्ये झालेल्या निर्णया नुसार 1350 एमएलडी वरुन 1150 पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुणे महापालिका प्रशासनाने शहरांचा विचार करिता दररोज पाच तास पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया विरोधात सर्व संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर या प्रश्नावर भाजप चे खासदार अनिल शिरोळे हे काल पुणे महापालिके बाहेर उपोषणास बसणार होते. शिरोळे यांच्या या भूमिकेमुळे शहरात पाणी प्रश्नावर एकच चर्चा सुरू झाली.

अनिल शिरोळे हे महापालिके समोर उपोषणास बसणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक याना मिळताच त्यांनी संवाद साधला त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. या पाणी प्रश्नावर आज महापौर बंगल्या वर महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल, महापालिका आयुक्त सौरभ राव, अधिकारी आणि नगरसेवक यांच्या समवेत बैठक सुरू आहे. जादा दाबाने दररोज पाणी मिळाले पाहिजे. या मागणीसाठी नागरिकांनी महापौर बंगल्या च्या आवारात ठिय्या मांडून आंदोलन करीत आहे. आता पाणी प्रश्नावर महापौर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. या बैठकी नंतर महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की,शहरातील सर्व भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कोणालाही त्रास होणार नाही. यावर विशेष उपाय योजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी नाही तर मत नाही, महापौर बंगल्या च्या आवारात नागरिकांच्या घोषणा

वयोवृद्ध महिला पुरुषांचा ठिय्या, रेव्हेन्यू कॉलनीत पाण्याची गंभीर समस्या असून मागील पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या प्रकरणी मनपा प्रशासनन आणि नगरसेवकांना अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने आम्हाला आंदोलना करावे लागले. हातात बादल्या घेऊन पाण्याची मागणी, पाणी नाही तर मतं नाही, अशी घोषणाबाजी करत नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.