पुणे : कामाच्या ठिकाणी टोमणे मारल्याने एकाचा खून करणाऱ्या तरुणाला सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावे लागेल, अशी तरतूद न्यायालायने निकालात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राकेश अविनाश गायकवाड (वय २३, सध्या रा. अत्रे वाडा, जेजूरी, ता. पुरंदर, जि. पुणे, मूळ रा. लक्ष्मीनारायणनगर, गोंधवणी रस्ता, ता. श्रीरामपूर, अहिल्यानगर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. १४ फेब्रुवारी रोजी राकेशने अविनाश रंभाजी महांकाळे (रा. बेलापूर, जि. अहिल्यानगर) यांचा खून केला होता. अविनाश आणि राकेश एका गृहप्रकल्पावर काम करत होते. घटनेच्या दिवशी अविनाश आणि सहकारी रात्री जेवण करत होते. राकेश याला काम येत नाही. तो दिखावा करतो, असे अविनाश यांनी सहकाऱ्यांनी सांगितले. राकेशला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तो तेथे आला. त्याने अविनाश यांच्याशी वाद धालून त्यांनी शिवीगाळ केली. त्याने अविनाश यांच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा – सराफी पेढीवर दरोडा टाकणारा चोरटा गजाआड

हेही वाचा – हवाई प्रवाशांना खुशखबर ! पुण्यातून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवेत वाढ

u

सहकाऱ्यांनी दोघांमधील भांडणे सोडविली. त्यानंतर सहकाऱ्यांनी या घटनेची माहिती गृहप्रकल्पातील वरिष्ठांना दिली. राकेशने अविनाश यांना शिवीगाळ केली. त्यांच्यावर चाकूने वार करुन खून केला. तो तेथून पसार झाला. थोड्यावेळाने सहकारी तेथे आले. तेव्हा अविनाश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांनी पाहिले. अविनाश यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. खून प्रकरणी राकेशविरुद्ध जेजूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक राजेश माळगावे यांनी तपास केला. सरकारी वकील लीना पाठक यांनी बाजू मांडली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजात पोलीस निरीक्षक संतोष घाेळवे, सहायक फौजदार विद्याधर निचित यांनी सहाय केले.