Pune Bypoll Election : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दोन जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येईल. भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; ११ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती

२७ फेब्रुवारी रोजी दोन्ही जागांसाठी होणार मतदान

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारी तर ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल. ३१ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल.

हेही वाचा >> त्रिपुरा, नागालँड, मेघालयमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर, १६ आणि २७ फेब्रुवारीला मतदान!

निवडणूक बिनविरोध होणार का?

भाजपाच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. कोणत्याही आमदार वा खासदाराचे निधन झाल्यास विरोधकांकडून त्या जागेवर उमेवार उभा केला जात नाही. त्या जागेवर बिनविरोध निवडणूक पार पडते. तसा महाराष्ट्रात प्रघात आहे. त्यामुळे या दोन जागांवरील निवडणूक बिनविरोध पार पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

हेही वाचा >> Indigo Airlines : भाजपा खासदाराने उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा? थोडक्यात अनर्थ टळला

त्रिपुरा, मेघालय, नागालँड राज्यांसाठी विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर

निवडणूक आयोगाने त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांसाठीदेखील निवडणूक कार्यक्रम जाहीर केल आहे. त्यानुसार त्रिपुरा राज्यात येत्या १६ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी नागालँड आणि मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. या तिन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pimpri chinchwad and kasba peth election date announced voting on 27 february prd