दिवाळीनिमित्त रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला भरधाव कारने धडक दिली आहे. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. १ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील रावेत भागत ही घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज आता पुढे आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे अद्यापही पोलिसांनी आरोपींचा शोध न घेतल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, सोहम पटेल असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. १ नोव्हेंबर रोजी रात्री तो त्याच्या रावेत येथील फेलीसिटी सोसायटीसमोर फटाके फोडत होता. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो रस्त्याच्या बाजुला जाऊन पडला. या भीषण अपघातामुळे त्याच्या डोक्याचा जबर मार लागला. या अपघातानंतर स्थानिकांनी याची माहिती लगेच पोलिसांना दिली. तसेच त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केलं.

हेही वाचा – एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट, दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज चोरीच्या घटनांमध्ये वाढ

दरम्यान, ४८ तास उलटूनही अद्याप पोलिसांनी वाहन चालकाला शोधून कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता नागरिकांकडून संताप व्यक्त केला आहे. पुण पोलिसांनी आरोपीला तत्काळ शोधून अटक करावी, तसेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे.

हेही वाचा – दिवाळीतील टिकल्या वाजविण्याच्या पिस्तुलाचा धाक, बाह्यवळण मार्गावर दहशत माजविणारे दोघे जण ताब्यात

खरं तर मागच्या काही महिन्यात पुण्यातील हिट अँड रनची ही दुसरी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी पोर्श गाडीने अशाचप्रकारे दोघांना धडक दिली होती. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी तसेच त्याच्या वडिलांना अटक केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pimpri chinchwad hit and run speeding car hit man while bursting firecrackers cctv spb