पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह, ग्रामीण भागातील हेल्मेट परिधान न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) २०० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. आता सोमवार (दोन डिसेंबर) सरकारी कार्यालयांमध्ये दुचाकीवरून येणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे यांनी पुण्यातील आरटीओ, पोलीस, जिल्हा प्रशानासह इतर विभागातील अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत शहर आणि जिल्ह्यातील अपघातांचा आढावा घेतला. होता. या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाणे दुचाकी चालकांचे असल्याचे आकडेवारीवरून समोर आले होते. हेल्मट सक्ती असताना हेल्मेट न घालणाऱ्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंंचालकांनी दिले. जिल्हाधिकारी डाॅ. दिवसे यांनी प्रशासकीय कार्यालयांपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत आणि इतर सरकारी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी आणि कार्यालयांत कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना हेल्मेटसक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : पुण्यातील २० शासकीय भूखंड केले खासगी…नक्की काय आहे प्रकरण ?

‘आरटीओ’कडून कारवाईला सुरुवात करण्यात आली असून विविध कार्यालयातील २०५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वाढविण्यात येईल, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.

शहरासह जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुुरुवात केली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये दुचाकींवरून येणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारपासून ही कारवाई सुरू केली जाणार आहे.

स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pimpri chinchwad municipal corporation rto action against 200 employees come without helmet to pmc pcmc premises pune print news vvp 08 css