पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांवर वर्चस्वासाठी रंगत पाहायला मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महापालिकांमध्ये अजित पवार यांचा हस्तक्षेप होण्याची शक्यता असून, त्यांची प्रशासनावरील पकड, कामाचा झपाटा पाहता पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि भाजपची कसोटी लागणार आहे. या दोन दादांपैकी कोणाच्या ताब्यात महापालिकांचा कारभार जाणार, याबात उत्सुकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नऊ सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचा पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात दबदबा आहे. पुण्यातील दोन्ही आमदारांसह जिल्ह्यातील पाच आमदार सध्या अजित पवार यांच्यासमवेत आहेत. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या; तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून जबाबदारी अजित पवार यांच्याकडे होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, अन्य प्रश्न, रखडलेले प्रकल्प याबाबत पवार आठवडय़ातून एकदा बैठक घेत होते. महाविकास आघाडीमध्ये पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मोठा निधी मिळवून दिला होता.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

 राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आणि पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली. मात्र, अजित पवार यांच्यासारख्या मातबर नेत्याचे चंद्रकांत पाटील यांच्यापुढे आव्हान असणार आहे. पालकमंत्रीपदाच्या एक वर्षांच्या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी अभावानेच बैठका घेतल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रश्नासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरात एकदाच बैठक घेतली. त्या तुलनेत पुण्यात बैठका झाल्या असल्या तरी फलनिष्पत्तीबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्याबाबतची नाराजी शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनही व्यक्त होत आहे. हीच बाब अजित पवार यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांबरोबरच जिल्हा नियोजन समितीही ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न पवार यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. पवार यांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. विविध प्रश्नांसंदर्भात ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतात, ही त्यांची कार्यपद्धती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अडचणीची ठण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहरात तर पवार यांचा मोठा दबदबा आहे. आगामी निवडणुका आणि राजकीय गणिते जुळविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका पवार यांच्या ताब्यात जाऊ न देण्याचे आव्हान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापुढे असणार आहे.

पालकमंत्रिपद बदलाची चर्चा

मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपद राहिले, तर भाजपचा पक्षविस्तार करण्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गटाला रोखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.

Story img Loader