‘पीएमपी’ प्रवाशाच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. याबाबत सचिन गुरव (वय-४५, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुरव वाघोली परिसरात कामानिमित्त गेले होते. तेथून ते पीएमपी बसनेनगर रस्त्याकडे जात होते. चोरट्यांनी गर्दीत गुरव यांच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी लांबविली. नगर रस्त्यावरील इनऑर्बिट मॅालसमोरील थांब्यावर ते बसमधून उतरले. तेव्हा त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करत आहेत.

पुणे : विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी महापालिकेच्या शाळेतील शिक्षक गजाआड

गेल्या काही महिन्यांपासून शहरात पीएमपी प्रवाशांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. गर्दीच्या मार्गावरील पीएमपी बसमध्ये शिरुन चोरटे महिलांचे दागिने लांबवितात. शहरातील पीएमपी स्थानकांच्या परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे.

Story img Loader