पुणे : हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक आणि मुंढवा चौक ते केसनंद फाटा या दोन नव्या मार्गांवर शुक्रवारपासून पीएमपीची सेवा देण्यात येणार आहे. रेल्वेच्या प्रवाशांसाठी हे दोन मार्ग सुरू करण्यात आले असून, आठवड्यातील रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी ते सुरू राहतील, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा : अतिक्रमण विरोधी पथकातील सहायक निरीक्षकाला कानाखाली मारली; बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेवर गुन्हा
मगरपट्टा, मुंढवा गाव, मुंढवा चौक, लोणकर काॅलनी असा हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक या गाडीचा मार्ग आहे. रेल्वेच्या वेळेनुसार या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत, तर माळवाडी मांजरी, आव्हाळवाडी, सातव पार्क, वाघोली बाजार असा मुंढवा चौक ते केसनंद फाटा या गाडीचा मार्ग आहे. या मार्गावर दर एक तासाने गाडी सोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा या माध्यमातून मिळणार असून, प्रवाशांनी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.